



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.10जानेवारी):- जिल्ह्यातील 30 हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे. त्यामुळे वंचित असलेल्या शेतकऱ्यांना आपल्या हक्काचा विमा मिळावा, यासाठी आज बीड तालुक्यातील 52 गावांमध्ये शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय.
2020 मध्ये चार लाख शेतकरी विम्या पासून वंचित आहेत. तर गतवर्षी 30 हजार शेतकऱ्यांना अद्यापही पिक विमा मिळालेला नाही.या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी 4 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली होती. परंतु प्रशासनाकडून अद्याप शेतकऱ्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने, आज संतप्त शेतकऱ्यांनी एक दिवसीय ठिय्या आंदोलन केलं आहे.
यावेळी सर्व गावात महसूल, कृषी आणि पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिले होते.


