Home महाराष्ट्र धरणगाव येथे “राजमाता जिजाऊ ” पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न…

धरणगाव येथे “राजमाता जिजाऊ ” पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न…

319

🔸पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी महामातांच्या जागरासाठी दिले १५०० ग्रंथ भेट.

🔹सत्यशोधक विचार मंचच्या वतीने पत्रकारांचा ग्रंथ देऊन सन्मान.

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.10जानेवारी):- येथील स्वामी विवेकानंद पतसंस्था सभागृह येथे आज रोजी “राजमाता जिजाऊ ” पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यशोधक लक्ष्मणराव पाटील यांनी केले. तत्पूर्वी सहकार क्षेत्रातील पितामह बी. बी. आबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तद्नंतर माँसाहेब जिजाऊ ते क्रांतीज्योती सावित्रीमाई जयंती उत्सवाच्या निमित्ताने ३ जानेवारी ते १२ जानेवारी महामातांचा जागर गावागावात करण्याचा आम्ही प्रयत्न केला. याच पर्वाचे औचित्य साधून धरणगाव येथे राजमाता जिजाऊ पुस्तिकेचे प्रकाशन आणि शहरातील व तालुक्यातील पत्रकारांचा ग्रंथ देऊन सन्मान करण्याचा आमचा मानस होता, असे प्रतिपादन लक्ष्मण पाटील यांनी केले.

पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छंदांचे छंदिष्ट वंजी देवालाल लोहार (गुरूजी) होते. राजमाता जिजाऊ पुस्तिकेचा लेखिका दर्शनाताई पवार यांच्यासह कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गुलाबराव वाघ, प्रा.बी.एन.चौधरी, डॉ.संजीवकुमार सोनवणे, अँड. वसंतराव भोलाणे, ज्ञानेश्वर महाजन, संजय महाजन, नगराध्यक्ष निलेश चौधरी, रतिलाल चौधरी, राजेंद्र महाजन, दिपक वाघमारे, जिवनसिंह बयस, कडू महाजन यांच्यासह आदी उपस्थित होते.विचार मंचावरील मान्यवरांनी राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते दर्शना पवार लिखित “राजमाता जिजाऊ” पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर दर्शना पवार यांनी मनोगतातून पुस्तिकेचे महत्व तसेच शहाजीराजे, जिजाऊ, शिवराय, संभाजी राजे यांचे कार्य विषद केले.

सर्व महामातांचा विचार आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. गावागावात महामातांचा विचार पोहचवावा, हा प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून लेखन केले आहे, असे प्रतिपादन दर्शना पवार यांनी केलेयाप्रसंगी गुलाबरावजी वाघ, डॉ.संजीवकुमार सोनवणे, अँड.वसंतराव भोलाणे, अँड.संजय महाजन, ज्ञानेश्वर महाजन यांनी महामातांचा विचार प्रबोधनाच्या कार्याची तोंडभरून कौतुक केले. सत्यशोधक विचार मंचच्या कार्यकर्त्यांचे कार्य अनमोल आहे, त्यांच्या कार्याला आमच्या मनस्वी शुभेच्छा आहेत, अशा भावना सर्वच मान्यवरांनी व्यक्त केल्या.सत्यशोधक विचार मंचच्या वतीने ६ जानेवारी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते धरणगाव शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांचा शाल, पुष्पगुच्छ आणि महापुरुषांचा अनमोल ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला.

तसेच मुख्याध्यापक संघाच्या आयोजित वकृत्व स्पर्धेत तालुक्यात प्रथम आलेली धनश्री पाटील हिचा देखील सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामातांच्या प्रबोधनाचा जागर करण्यासाठी अनमोल सहकार्य केल्याबद्दल लहान माळी वाडा धरणगाव, विवरे, पष्टाणे खु॥, बांभोरी बु॥, गंगापुरी बु॥, गारखेडे, धानोरे, सोनवद बु॥, भवरखेडे येथील मान्यवरांचा महापुरुषांचे ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी श्रोत्यांमधून विवरे येथील उमेद बचत गटाच्या सी.आर.पी. जयश्री गणेश पाटील यांनी मनोगतातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

अध्यक्षीय भाषणात वंदे लोहार गुरुजींनी सत्यशोधक विचार घराघरात पोहचविण्याचे काम करणाऱ्या सत्यशोधक आबासाहेब राजेंद्र वाघ, लक्ष्मणराव पाटील, हेमंत माळी सर, गोरख देशमुख, पी.डी.पाटील सर व संपूर्ण टीमचे कौतुक करून त्यांना पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.डी.पाटील सर यांनी तर आभार प्रदर्शन हेमंत माळी सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद पतसंस्थेने हॉल व इतर गोष्टी उपलब्ध करून अनमोल सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश बिवाल, दिनेश भदाणे, निलेश पवार, नगर मोमीन, विक्रम पाटील, देवानंद चव्हाण, प्रफुल पवार, प्रथम पवार, योगेश नवनीत पाटील, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे सर्व कर्मचारी वृंद तसेच सर्व वैचारिक मित्रांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here