Home महाराष्ट्र कमलापुर येथील हत्तींचे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा कॉंग्रेसची मुख्यमंत्र्याकडे मागणी-जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले निवेदन

कमलापुर येथील हत्तींचे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा कॉंग्रेसची मुख्यमंत्र्याकडे मागणी-जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले निवेदन

255

🔹कमलापूर हत्ती कॅम्प जिल्ह्याचे भूषण आहे -महेंद्र ब्राम्हणवाडे

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.10जानेवारी):-गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी जंगलाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती व वन्यजीव आढळून येतात. त्यामुळे जिल्ह्यात मोठे उद्योग निर्माण होऊ शकले नाही परंतु जिल्ह्यात वनवैभव, जंगली प्राणी असल्यामुळे जंगलसफारी तसेच पर्यटन स्थळे विकसित करून स्थानिक आदिवासी, गोरगरीब जनतेला छोट्या – मोठ्या व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो मात्र गडचिरोली जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण माहाराष्ट्रराचं वैभव असलेल्या राज्यातील एकमात्र कमलापूर च्या कॅंम्प मधील हत्ती गुजरात राज्यातील रिलायन्स ग्रुप च्या प्राणीसंग्रहालयात नेण्यात येणार असल्याने येथील स्थानिकांचा रोजगार हिरावू शकतो.

त्यामुळे येथील स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन हत्तींच्या स्थलांतरनाची कार्यवाही त्वरित रोखण्यात यावी. सदर हत्तीचे स्थलांतरण करण्यात आल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असे निवेदन जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे मार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कडे देण्यात आले आहे . यावेळी प्रदेश कॉंग्रेसचे महासचिव डॉ.नितीन कोडवते, सोशल मिडिया प्रदेश महासचिव नंदू वाईलकर, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, अनुसूचित विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, काँग्रेस नेते हरबाजी मोरे, जितेंद्र मुनघाटे, संजय चन्ने, प्रतिक बारसिंगे, नदीम नाथानी , नरेश सोरते, गौरव येप्रेद्दीवार, विपुल एलट्टीवार सह अनेक काँग्रेस नेते यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here