



🔸पंतप्रधान होण्यापेक्षा सरपंचपद अवघड : सौ.संगीता साळुंखे
✒️सातारा(पुरोगामी न्युज नेटवर्क)
सातारा(दि.10जानेवारी):-सरपंचपद हे काटेरी मुकुट असुन निवडी अगोदर व नंतरही अडचणी निर्माण होत असते.पंतप्रधान होण्यापेक्षा सरपंचपदी विराजमान होणे अवघड आहे. असेही खुमासदार व अभ्यासपूर्ण विचार जिल्हा राष्ट्रवादीच्या नेत्या तथा माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ.संगीता साळुंखे यांनी केले.जिल्हा हिंदी अध्यापक मंडळातर्फे येथील राष्ट्रभाषाभवन येथे राष्ट्रभाषा प्रचार-प्रसारार्थ योगदान देणारे महाराष्ट्र राज्य महामंडळाचे उपाध्यक्ष ता.का सूर्यवंशी,सौ. कांचन ता.सूर्यवंशी व सौ.समीना इकबाल मुल्ला या दाम्पत्यासह सेवानिवृत्तीबद्धल श्रीमती सुनंदा गाडवे व कराडभूषण सरपंच डॉ. शंकरराव खापे यांचा सत्कार माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. संगीता साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आला.तेव्हा त्या मार्गदर्शन करीत होत्या.
सौ.साळुंखे म्हणाल्या, “या कार्यक्रमास पालकमंत्री आले नसल्याने आपल्या हातून चांगले काम झाले आहे.” पुरस्कार्थिनी अधिकाधिक काम करण्यासाठीच सत्कार होत असतात.ता.का. सूर्यवंशी यांचे संघटन दिशादर्शक आहे.
मनोगतासह प्रास्ताविक ता.का. सूर्यवंशी यांनी आपल्या ४० वर्षापासुनचा आढावा घेऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. याशिवाय,सर्वच सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त करून ता.का. व अध्यापक मंडळ यांचे विशेष आभार मानले.स्वागतगीत व इशस्तवन सौ.मनीषा बडीगार,अनीलकुमार कदम आदींनी केले.सदरच्या कार्यक्रमास शिवाजीराव खामकर,अनंत यादव,श्री.व सौ.सुनंदा मारुती शिवदास, श्रीकांत लावंड,नेताजी पाटील, अनंत यादव सुधाकर माने, नवनाथ शिंदे,नवनाथ कदम, दिनकर माथणे आदी जिल्हा पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.


