



🔹वंचित बहुजन आघाडीची मागणी
✒️सतारा(पुरोगामी न्युज नेटवर्क)
सातारा(दि .10जानेवारी):- राज्यात तसेच देशात सद्या ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाचा प्रश्न फार गंभीर झाला असून सद्या राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याचे दिसत आसताना ते वाचवन्याचा प्रयत्न कोनताच प्रस्तापीत पक्ष म्हनजेच भाजप,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना करताना दिसत नाही मात्र एक मेका कडे बोट दाखवन्यात वेळ घालवून ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण घालवन्याचाच प्रयत्न करतात की काय आसे वाटूलागल्याने आता याच प्रस्तापीत पक्षातील ओबीसी प्रवर्गातील लोकप्रतीनीधी व मंत्री यांनी सामाजीक हीत पाहून आरक्षण वाचवन्यासाठी आपापल्या पक्षानवर दबाव तंत्र वापरन्यासाठी तरी राजीनामे द्यावेत अशी मागनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शाकेरभाई तांबोळी यांनी निवेदना द्वारे केली
यावेळी केंद्र सरकार आमच्याकडे एम्पीरीयल डाटा हा परीपूर्ण नसल्याने तो आम्ही देनार नाही आसे अँपेडेव्हीट सादर करून सांगीतले आणी त्याच बरोबर जातनाहीय जनगनना करनार नसल्याचे सांगीतल्याने केंद्र सरकार मधील भाजप व त्यांचे मित्र पक्षांनी आपली आरक्षण विरोधी भुमीका स्पष्टच केली आसल्याने ती मागे घ्यावी या करीता भाजप व त्यांच्या मित्र पक्षातील ओबीसी लोकप्रतीनीधी व मंत्री यांनी ओबीसी आरक्षण बचाव मागनीसाठी व सादर केलेले अँपेडेव्हीट मागे घेऊन जातनीहाय जनगनणा करन्याच्या मागनीसाठी दाबाव तंत्र म्हनून राजीनामे द्यावेत या मागनी करीता सातारा जिल्ह्यातील भाजपचे एकमेव आमदार जयकूमार गोरे यांना भेटून वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देन्यात आले.
त्याच बरोबर राज्यातील आघाडी सरकार मधील तीन्ही पक्षांनी सूद्धा ओबीसी प्रवर्गाचा इम्पीरीयर डाटा तयार करन्यासाठी आयोग नेमला परंतू त्यांना कोनताही साधने व अर्थीक बजेट दिले नसल्याने तेही काम करू शक्ले नाहीत आणी या वेळकाडू पनामुळे तेही आरक्षण वाचवूशक्ले नाहीत मात्र ओबीसी प्रवर्गाची बोळवन करन्याचे काम सरकार मधील लोकप्रतीनीधी व मंत्र्यांनी केले आहे त्यामुळे सरकार मधीलही ओबीसी प्रवर्गातील लोकप्रतीनीधी व मंत्री गनांनी राजीनामे द्यावेत या मागनीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देन्यात येनार आसल्याचेही निवेदनात नमूद करनेत आले आहे.
तरी सर्व प्रस्तापीत पक्षातील लोकप्रतीनीधी व मंत्री यांनी ओबीसी आरक्षण प्रश्नावर राजीनामे द्यावेत यासाठी जशी वंचित बहुजन आघाडीने मोहीम चालवली आहे तसीच मोहीम ओबीसी प्रवर्गातील सर्व संघटनांनी सुद्धा आशीच मोहीम राबवने गरजेचे आसल्याचेही वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाकीरभाई तांबोळी यांनी सांगीतले यावेळी शिष्टमंडळात पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सम्राट शिंदे,चंद्रकांत खंडाईत,जिल्हा सचिव सुनिल कदम,जिल्हा संघटक ईम्तीयाज नदाफ,मान तालूका अध्यक्ष युवराज भोसले,सातारा तालुका अध्यक्ष श्रिरंग वाघमारे सहभागी होते.





