Home महाराष्ट्र सावित्रीमाई यांच्या जयंतीदिनी बांभोरी बु॥ येथे वैचारिक प्रबोधन संपन्न…

सावित्रीमाई यांच्या जयंतीदिनी बांभोरी बु॥ येथे वैचारिक प्रबोधन संपन्न…

108

🔸महामातांचे विचार प्रेरणादायी – शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील.

🔹माँसाहेबांनी संस्कार व सावित्रीमाईंनी शिक्षण दिले – पी.डी.पाटील.

✒️धरणगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

धरणगांव(दि.9जानेवारी):- – ६ जानेवारी , २०२२ गुरूवार रोजी धरणगाव तालुक्यातील बांभोरी बु॥ गावात ३ जानेवारी ते १२ जानेवारी निमित्त महिला शिक्षण दिन, बालिका दिन, महिला मुक्ती दिन याचे औचित्य साधून महामातांचा जागर करण्यात आला.या वैचारिक प्रबोधन व्याख्यानाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते लिलाधर पाटील यांनी केले.याप्रसंगी वैचारिक प्रबोधनाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्या तथा उपसभापती शारदाबाई प्रेमराज पाटील होते. प्रमुख वक्ते महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील व शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून बांभोरी गावाचे सरपंच कमलबाई भिल, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्या पुनम पाटील, मनिषा सोनवणे, आबासाहेब राजेंद्र वाघ, गोरख देशमुख, दिनेश भदाणे, विक्रम पाटील उपस्थित होते.

सर्व सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, कुळवाडीभूषण – बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय, विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून महिला सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख वक्ते व सर्व विचार मंचावरील उपस्थित प्रमुख अतिथींचे महापुरुषांचे ग्रंथ लिहून देऊन स्वागत करण्यात आले.वैभव पाटील यांनी प्रमुख वक्ते पी.डी.पाटील, शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांचा परिचय करून दिला. पी.डी.पाटील यांनी शिक्षण क्रांतीच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले यांच्या जीवन संघर्षावर प्रकाश टाकला या सोबतच राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, अहिल्याराणी होळकर, फातिमाबी शेख, त्यागमूर्ती रमाई, विरागंणा झलकारी देवी या सर्व महामातांचे चरित्र उलगडले. या महामातांच्या कार्यकर्तृत्वामुळेच आजची महिला सक्षम झालेली आहे. या सर्व महामातांचे कार्य अतिशय प्रेरणादायी आहे. सावित्रीमाईंचे कार्य सांगत असताना राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांची साथ खूप मोलाची होती. शिवजयंती चे खरे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आहेत असे प्रतिपादन केले.

शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी महिलांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचे काम फुले दांपत्यांनी केलेले आहे. आजच्या सर्व माता – भगिनींनी माँसाहेब जिजाऊ ते सावित्रीमाई पर्यंतच्या महामातांचा आदर्श घेऊन मार्गक्रमण केले पाहिजे. अंधश्रद्धा , कर्मकांडापासून दूर रहा आणि शिक्षणाचा ध्यास घ्या. आज घराघरात माँ जिजाऊ – सावित्रीमाई जन्माला यायला हव्यात !…. असे प्रतिपादन केले.सर्व उपस्थित माता – भगिनी व बांधवांना विद्येची महानायिका सावित्रीमाई फुले, महापुरुषांचे व महामातांचे ग्रंथ भेट देण्यात आले. या वैचारिक प्रबोधनाचे सूत्रसंचालन लिलाधर पाटील व आभार प्रमोद जगताप यांनी मानले. प्रबोधनपर व्याख्यान यशस्वीतेसाठी बांभोरी बु॥ गावाचे सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, वैभव पाटील, सागर महाले, प्रमोद जगताप, अक्षय सोनवणे, स्वप्नील पाटील, शरद हेमराज पाटील, राहुल महाजन, अमित पाटील सर्व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here