Home बीड ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रिडा क्षेत्रात करिअर करावे – रणवीर अमरसिंह पंडित

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रिडा क्षेत्रात करिअर करावे – रणवीर अमरसिंह पंडित

86

🔹रामपुरी विद्यालयात लसीकरण मोहीम

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.9जानेवारी):-विद्यार्थ्यांनी शिक्षणा बरोबर स्पोर्ट्स मध्ये प्रगती करुन आपले टॅलेंट जगाला दाखवले पाहिजे, आपले नाव उज्वल केले पाहिजे, स्पोर्ट मध्ये करिअर करण्यासाठी खूप मोठ्या संधी आहेत, शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात मुलांना योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी आणि आमचा शिवछत्र परिवार सदैव प्रयत्न करत आहे असे प्रतिपादन युवानेते रणविर अमरसिंह पंडित यांनी केले.जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रामपुरी येथे ते बोलत होते.

जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता ९ वी ते१२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. युवानेते रणविर पंडित यांच्या शुभहस्ते लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रदीप दादा मस्के, राष्ट्रवादी किसन सेलचे तालुकाध्यक्ष सुभाष दादा मस्के, राष्ट्रवादीचे युवानेते महादेव आंभुरे, कैलास सरक, वैद्यकिय अधिकारी श्रीमती पल्लवी झोडगे उपस्थित होते.

यावेळी बोलताना रणविर पंडित पुढे म्हणाले की, ज्यांना खेळात आवड आहे त्यांनी पुढे यावे, आम्ही तुमच्यासाठी तयार आहोत असे सांगून आपल्या घरातील आई ,वडील, काका, काकी, भाऊ-बहीण सगळ्या परिवाराने स्व: ईच्छेने लसीकरण करून या मोहिमेला प्रतिसाद द्यावा व आपली शाळा, गाव, तालुका, जिल्हा व आपला देश कोरोना मुक्त होण्यासाठी मदत करावी असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक तौर यांनी केले. सुत्रसंचालन जाधव एल.जी.यांनी तर आभार सुधाकर देशमुख यांनी मानले.लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. चाळक, डॉ. मुंडे, डॉ. राठोड,वखरे सिस्टर,आशा सेविका उनवणे, बनसोडे, शाळेतील सर्व शिक्षकवृंद व प्राध्यापक, आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अथक परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here