Home महाराष्ट्र सावित्रीमाई व जिजाऊ जयंतीनिमित्त गारखेडे येथे वैचारिक प्रबोधन संपन्न…

सावित्रीमाई व जिजाऊ जयंतीनिमित्त गारखेडे येथे वैचारिक प्रबोधन संपन्न…

310

🔹अंधश्रद्धा व कर्मकांडापासुन दुर रहा – हेमंत माळी सर

🔸स्त्री शिक्षणाचे खरे जनक फुले दांपत्यच !.. -शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील.

🔹शिवरायांच्या खरे गुरु माँसाहेब जिजाऊ – पी.डी. पाटील.

✒️पी.डी.पाटील(विशेष प्रतिनिधी)

धरणगांव(दि.9जानेवारी):- २०२२ शनिवार रोजी धरणगाव तालुक्यातील गारखेडे गावात ३ जानेवारी ते १२ जानेवारी निमित्त महिला शिक्षण दिन, बालिका दिन, महिला मुक्ती दिन याचे औचित्य साधून महामातांचा जागर करण्यात आला. या वैचारिक प्रबोधन व्याख्यानाचे प्रास्ताविक भाजपाचे तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील यांनी केले.या वैचारिक प्रबोधनाच्या अध्यक्षस्थानी गारखेडे व बाभळे ग्रुप ग्रामपंचायच सरपंच रंजनाबाई जिजाबराव पाटील होते. प्रमुख वक्ते महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील, हेमंत माळी, शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील होते.

प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच साधनाताई पाटील, ग्रा.स. रजूबाई पाटील, संगीताबाई पाटील, जितेंद्र गजरे, अफ्रोज पटेल, जिजाबराव पाटील उपस्थित होते. सर्व सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख वक्ते व सर्व विचार मंचावरील उपस्थित प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.जिजाबराव पाटील यांनी प्रमुख वक्ते पी.डी. पाटील, हेमंत माळी, शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांचा परिचय करून दिला. हेमंत माळी यांनी महामातांचे जीवन चरित्र सांगून, सर्वांनी अंधश्रद्धा व कर्मकांडापासून दूर रहा असे प्रतिपादन केले. पी.डी. पाटील यांनी शिक्षण क्रांतीच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले यांच्या जीवन संघर्षावर प्रकाश टाकला या सोबतच राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, अहिल्याराणी होळकर, फातिमाबी शेख, त्यागमूर्ती रमाई, विरागंणा झलकारी देवी या सर्व महामातांचे चरित्र उलगडले.

छत्रपती शिवरायांच्या खऱ्या गुरु माँसाहेब जिजाऊ आहेत. शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी महिलांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचे काम फुले दांपत्यांनी केलेले आहे. आजच्या सर्व माता – भगिनींनी माँसाहेब जिजाऊ ते सावित्रीमाई पर्यंतच्या महामातांचा आदर्श घेऊन मार्गक्रमण केले पाहिजे. घराघरात जिजाऊ जन्माला आल्या पाहिजे.. असा मोलाचा संदेश दिला.सर्व उपस्थित माता भगिनी व बांधवांना विद्येची महानायिका सावित्रीमाई फुले, महापुरुषांचे व महामातांचे ग्रंथ भेट देण्यात आले. या वैचारिक प्रबोधनाचे सूत्रसंचालन व आभार भाजपाचे तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील यांनी मानले. प्रबोधनपर व्याख्यान यशस्वीतेसाठी गारखेडे गावातील युवक मित्र व सर्व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here