Home Breaking News अंबाजोगाई-लातूर महामार्गावर बस व ट्रकचा भीषण अपघात; सहा ठार, आठ जखमी

अंबाजोगाई-लातूर महामार्गावर बस व ट्रकचा भीषण अपघात; सहा ठार, आठ जखमी

603

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

अंबेजोगाई(दि.9जानेवारी):^अंबाजोगाई – लातूर रोडवर बर्दापूर जवळ नंदगोपाल डेअरी समोर आज (दि. ०९) सकाळी ८.३० वा. लातूर – औरंगाबाद बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सहा जण जागीच ठार आणि दहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की क्रेनच्या साह्याने दोन्ही वाहने बाजूला करून जखमींना बाहेर काढावे लागले. जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Previous articleप्रपंच्या सोबतच परमार्थ साधावा: – पुरुषोत्तम पत्रे
Next articleआम्ही बौध का होतो याचा हेतु जो पर्यंत लक्षात येते नाही तो पर्यंत बौध्द होणार्याच्या लक्षात येणार नाही -डाॅ. राजरत्न आंबेडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here