Home महाराष्ट्र प्रपंच्या सोबतच परमार्थ साधावा: – पुरुषोत्तम पत्रे

प्रपंच्या सोबतच परमार्थ साधावा: – पुरुषोत्तम पत्रे

349

🔸रणमोचन येथे भागवत सप्ताहाचा समारोप

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.9 जानेवारी):- जनसेवेतुन समाजऋण फेडण्यासाठी व लोक कल्याणासाठी अध्यात्मिक ज्ञान सुद्धा महत्वाचे आहे त्यासाठी ते ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविता येईल याकरीता बऱ्याचशा गावात भागवत सप्ताहाचे आयोजन केले जातात मात्र आजच्या युगातील धकाधकीच्या काळात केवळ पैशाच्या पाठीमागे न लागता आपल्याला उपयुक्त मार्गासाठी काही तरी देणे आहे हा उदात्त हेतू ठेवून प्रपंच्या सोबतच मुख्यत्वे वेळात वेळ काढून परमार्थही साधावा असे मौलिक विचार गांगलवाडी लोक विद्यालयातील माजी सहाय्यक शिक्षक पुरुषोत्तम पत्रे यांनी रणमोचन येथील भागवत सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमा- प्रसंगी बोलताना प्रमुख मार्गदर्शक म्हणून माडले.

दिनांक 1 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान रणमोचन येथे भागवत सप्ताहाचे वाचन ह.भ. प. सुरेंद्रजी बावणे महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून करण्यात आले 7 जानेवारी रोजी गोपाल काला व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून – गोवर्धन दोनाडकर( पत्रकार) तथा सचिव ब्रह्मपुरी तालुका पत्रकार संघ ब्रह्मपुरी , योगेश ढोरे अध्यक्ष सेवा सह. संस्था कीन्ही,सरपंच सौ. निलिमाताई राऊत, उपसरपंच सदाशिव ठाकरे,गौरकर साहेब ब्रह्मपुरी,विट्टल तुंबडे धान्य व्यापारी सरपंच नीलिमा राऊत उपसरपंच सदाशिव ठाकरे ग्रामपंचायत सदस्य संजय प्रधान. अश्विनीताई दोनाडकर,मंदाताई सहारे, कोमल मेश्राम, दादाजी पिलारे अध्यक्ष तंमुस रनमोचन, पांडुरग प्रधान, ह. भ. प. सुरेंद्रजी बावनकर महाराज नागपूर, सोमेश्वर दोनाडकर महाराज, योगेश पिलारे, रवींद्र पिलारे पोलीस पाटील अस्मिता पिलारे भाऊराव दोनाडकर श्रावण तोंडरे विठ्ठल सहारे वासुदेव मेश्राम, रमेश मेश्राम गजानन दहिकर तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष दादाजी पिलारे नामदेव सहारे व अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक शांताराम कावळे तर संचालन चंद्रलाल सहारे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here