Home महाराष्ट्र एसटी संपामुळे ग्रामस्थ,विद्यार्थ्यांची लुट

एसटी संपामुळे ग्रामस्थ,विद्यार्थ्यांची लुट

87

✒️भास्कर फरकडे(तालूका प्रतीनिधी चामोर्शी)मो:;9404071883

चामोर्शी(दि.9जानेवारी):-शासन विलगीकरणाच्या मागणीला घेऊन मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा तोडगा अद्यापही सुटलेला नसल्याने या संपाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना विद्यार्थ्यांना अधिक बसत आहे शिक्षणासाठी शहर स्थळी येण्यासाठी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असुन खासगी वाहन धारकाकडून होणारी लुट बघता ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत जाणेही टाळले असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोणा महामारी कालावधी पुर्वीपासून परिवहन विभागाला अवकाळी आली होती.

यातच एसटी कर्मचाऱ्यांनी शासन विलगीकरणाच्या मागणीला घेऊन मागील दोन महिन्यांपासून बंद पुकारला असल्याने महामंडळ अधिकच नुकसानीच्या खाईत लोटली आहे महामंडळाला दिवसाकाठी लाखोंचे नुकसान सोसावे लागत असताना प्रवाशांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे ग्रामीण भागातील नागरिकांना तालूका व शहरीस्थळी येण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार ध्यावा लागत आहे यातच खाजगी वाहनधारकाकडुन अवाजवी भाडे आकारले जात असल्याने प्रवासी त्रस्त आहेत या एसटी बंद मुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीही त्रस्त दिसुन येत आहेत गावातून शहरातील शाळेत येण्यासाठी खाजगी वाहनांला दुप्पट रक्कम मोजावी लागत असल्याने पालक वर्ग चिंतेत आहेत आर्थिक परिस्थिती हलाकीच्या असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी तर शाळेत जाणेच टाळले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here