Home महाराष्ट्र चोरट्यांनी झोडपलेल्या आखाड्यास सखाराम बोबडे पडेगावकर यांची भेट

चोरट्यांनी झोडपलेल्या आखाड्यास सखाराम बोबडे पडेगावकर यांची भेट

271

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.8जानेवारी):-मागील आठ दिवसापूर्वी आनंदवाडी शिवारात चोरट्यांनी आखाडा झोडपला होता. चोरट्याच्या हल्ल्याने भयभीत झालेल्या आखाड्यावरील शेतकऱ्यांची सखाराम बोबडे पडेगावकऱ यांनी भेट घेत त्यांना धीर दिला.मरडसगावं शेजारील आनंदवाडी येथे रोडच्या बाजूला आखाडा आहे . बळीराम ठवरे यांच्या आखाडावर चोरट्यांनी हल्ला करून मारहाण करत महिलांच्या अंगावरील दागिने लंपास केले होते.

परिसरातील शेतकरी या घटनेने भयभीत झाले होते.परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर व सरपंच जयदेव मिडसे यांनी काल आखाड्यावरील शेतकऱ्यांची भेट घेत आखाड्याची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शेतकऱ्यांना बंदूक परवाना मिळावा अशी मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी मुंजाभाऊ कुगणे उपस्थित होते.

Previous articleब्रम्हपुरी पोलिस स्टेशन येथे रक्तदान शिबिर संपन्न
Next articleभाजपा घुग्घुसतर्फे पंजाब काँग्रेस सरकारचा निषेध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here