



✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.8 जानेवारी):-रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असे म्हटल्या जाते. सध्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकदा रक्ताची गरज असलेल्या रुग्णाला वेळेवर रक्त उपलब्ध होत नाही.त्यामुळे समाजाच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असलेले पोलिस बांधव आता रक्तदान चळवळ समाजात रूजली पाहीजे म्हणून महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनच्या वतीने पोलिस स्टेशनच्या आवारात रक्तदान शिबिराचे आयोजन, 5 जानेवारी रोजी करण्यात आले होते.
सदर रक्तदान शिबीराचे उद्घाटन प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे, पोलिस निरीक्षक रोशन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कुमरे, पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे, पोलिस उपनिरीक्षक राजेश उंदीरवाडे, पोलिस उपनिरीक्षक मोरेश्वर लाकडे, पोलिस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर, नायक पोलिस शिपाई राहुल लाखे यांसह सर्व अधिकारी व पोलिस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.सदर शिबीरादरम्यान ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन येथील कर्मचारी, बेटाळा येथील महाराष्ट्र इन्स्टीट्यूट ऑफ फार्मसीचे विद्यार्थी, तसेच अन्य नागरिकांनी रक्तदान केले.





