



🔸मोकाट गुरांची प्रशासनाने व्यवस्था करावी नागरिकांची मागणी
✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
गेवराई(दि.8जानेवारी):- शहरांमध्ये मोकाट गुरांची संख्या वाढली आहे. भर रस्त्यात दोन वळुंची झुंज झाल्याने नागरीक चांगलेच भयभित झाले. मोकाट गुरे शहरातील मेन रस्त्यांवर, चौकांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी सतत वावरत असतात त्यामुळे नागरिकांना भयभीत होऊनचं शहरातील रस्त्यावरुन जा ये करावी लागते. असेच दोन वळु आमने सामने आल्याने त्या दोघांची रस्त्यावरचं चांगलीच झुंज लागलेली दिसुन आली.
यावेळी रस्त्यावरुन किंवा कामानिमित्त शहरात आले असलेले लोकं काही वेळ भयभीत झाले होते. तर, दोन वळुंची झुंज पहाण्यासाठी लोकांनी गर्दी ही केली होती तर काहींनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये व्हिडीओ ही कैद केले. मात्र या मोकाट गुरांची प्रशासनाने व्यवस्था करावी अशी मागणी आता नागरिक करत आहेत.


