



✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)
शिंदखेडा(दि.8जानेवारी):-तालुक्यातील झोतवाडे येथे उज्वला योजना अंतर्गत ४८ लाभार्थीना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले.तसेच प्रधानमंत्री उज्वला योजना भारत गॅस योजनाच्या वतीने राबविण्यात आली आहे. मात्र या योजनेत नागरीकांना तब्बल एकुण ४८ गॅस कनेक्शनचे झोतवाडे गावातील लाभार्थीना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. जयकुमार भाऊ रावल यांच्या प्रयत्नाने व झोतवाडे येथील सरपंच शोभाबाई सुनील ठाकरे यांचे पाठपूर्वठ्याच्या वतीने हा कार्यक्रम राबविण्यात आला होता.
तसेच उज्वला योजना अंतर्गत लाभार्थींनी सरपंच उपसरपंच सदस्य यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.तसेच यावेळी झोतवाडे गावाचे सरपंच शोभाबाई सुनिल ठाकरे व सदस्य सुनिल ठाकरे,प्रविण ठाकरे,नरेंद्र सदाराव,रेशमबाई ईशी,फुलाबाई शिरसाठ,कामराज भाऊसाहेब निकम व नारायण बाजीराव पाटीलआदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


