Home महाराष्ट्र नकोडा वासियांना मिळणार जागेचा पट्टा

नकोडा वासियांना मिळणार जागेचा पट्टा

269

🔸माजी उपसरपंच हनीफ मोहम्मद यांच्या मागणीला यश

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.8जानेवारी):-जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे नकोडा गावातील नझुलच्या जागेवर वास्तव्य करीत असलेल्या कुटुंबाना जागेचा पट्टा मिळण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वेकोलीचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे, तहसीलदार निलेश गौड, नकोडा सरपंच श्री. किरण बांदूरकर माजी उपसरपंच हनीफ मोहम्मद नकोडा ग्रामसचिव उपस्थित होते.
मागील 50 ते 60 वर्षांपासून नकोडा येथे नझुलच्या जागेवर व वेकोलीच्या जागेवर जवळपास 2,000 घरे आहे यात अनेक नागरिक कुटुंबासह वास्तव्यास आहे या घरांना आता पर्यंत पट्टे मिळाले नाही गट क्र.57 ही जागा वेकोलीची आहे.

नकोडा येथे अंडर ग्राउंड कोळसा खाण असतांना तीन वेळा येथील झोपडपट्टीला आग लागली होती.या जागेचा पट्टा मिळण्यासाठी नकोडा माजी उपसरपंच हनीफ मोहम्मद यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता.त्यामुळे ही बैठक घेण्यात आली होती बैठकीत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासनास याबाबतची संपूर्ण माहिती सादर करण्याचे पुढील शुक्रवार पर्यंत निर्देश दिले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here