



🔹खेळाडूंनी भारतात गडचिरोली जिल्ह्याचे नांव उज्वल करावे: – जिल्हा परिषद सदस्या सौ रूपालीताई पंदिलवार
✒️भास्कर फरकडे(तालूका प्रतीनिधी चामोर्शी)मो:-9404071883
चामोर्शी(दि.8जानेवारी):-तालुक्यातील आष्टी येथे महालक्ष्मी क्रिकेट महोत्सव 2022 बालाजी टाऊन क्रिकेट क्लब आष्टी यांचे वतीने क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते व अंतिम सामन्यांनंतर आज आष्टी ईल्लूर क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या तथा गडचिरोली जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सौ रूपालीताई पंदिलवार यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम बक्षीस आलापली येथील क्रिकेट संघांनी पटकविले. तर द्वितीय बक्षीस बालाजी टाऊन क्रिकेट क्लब आष्टी संघाने पटकविले तृतीय बक्षीस आष्टी क्रिकेट संघ यांना मिळाला असे पुरस्कार देऊन विजेत्या संघांना सन्मानित करण्यात आले आजचे युग स्पर्धेचे आहे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी क्रिकेट, कबड्डी,हाॅलीबाल स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहेत.
या स्पर्धांमध्ये मोठया प्रमाणावर खेळाडू सहभागी होत असून खेळाडूंनी खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व घडवून आपले व आपल्या संघाचे नांव उज्वल करून खेळाडूनी भारतात गडचिरोली जिल्ह्याची ओळख निर्माण करून द्यावी असे बक्षीस वितरणाच्या क्राय॔क्रमात रूपालीताई पंदिलवार या बोलत होत्या यावेळी सामाजिक कार्यकर्ता संजयराव पंदिलवार अडपलीचे उपसरपंच महेंद्रबाबा आत्राम,मारकंडा कंनसोबा येथील माजी सरपंच गंगाधर पोटवार,काँग्रेस यूवा कार्यकर्ता आयूशकूमार पंदिलवार आदि मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंनी मोठया उत्साहाने जलोष साजरा केला यावेळी यशस्वीतेसाठी बालाजी टाऊन क्रिकेट क्लब आष्टी यांचे कडून रूपेश करडे, यांचे मार्गदर्शनाखाली मंडळांचे सर्व पदाधिकारी यांनी अथिक परीश्रम घेतले


