Home महाराष्ट्र स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार योजना 2021 प्रवेशिकांबाबत

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार योजना 2021 प्रवेशिकांबाबत

91

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.7जानेवारी):-महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार या योजनेअंतर्गत निवडीअंती सन 2021 चे राज्य वाङमय पुरस्कार प्रदान करण्यासाठी दिनांक 01 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत प्रकाशित झालेल्या प्रथम आवृती पुस्तकासाठी, दिनांक 01 जानेवारी 2022 ते 31 जानेवारी 2022 या विहित कालावधीत प्रवेशिका मागविण्यात आलेल्या आहेत.

जिल्हयातील लेखकांना व प्रकाशकांना या योजनेअंतर्गत प्रवेशिका सादर करणे सुलभ व्हावे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार 2021 नियमावली व प्रवेशिका’ या शिर्षाखाली व what’s new या सदरात ‘ Late Yashwantrao Chavan State Literature Award 2021 Rules Book and Application Form ‘ या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणी संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पुर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणी संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 01 जानेवारी 2022 ते 31 जानेवारी 2022 या विहित कालावधीत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. प्रवेशिका दिनांक 31 जानेवारी पर्यंत *जिल्हाधिकारी कार्यालयाकडे* पाठविण्यात याव्यात. तदनंदर प्रवेशिका स्वीकारण्यात येणार नाहीत कृपया नोंद घ्यावी.

Previous articleदर्पण दिनानिमित्त गंगाखेड शहरातील पत्रकारांचा विविध ठिकाणी सत्कार
Next articleकवींचे कॅलेंडर २०२२ चे उद्योजक श्री कृष्णकुमार गोयल यांच्या शुभहस्ते प्रकाशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here