Home महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटना, शाखा – दिंडोरी या नवनियुक्त कार्यकारिणीचा...

महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटना, शाखा – दिंडोरी या नवनियुक्त कार्यकारिणीचा जि.प.प्राथमिक शाळा पिंपळपाडा व ग्रामस्थ यांच्या तर्फे सत्कार

247

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

दिंडोरी(दि.7जानेवारी):– जि.प.प्राथमिक शाळा पिंपळपाडा येथील शाळेच्या वतीने तसेच शाळा व्यवस्थापन समिती व पिंपळपाडा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटना शाखा – दिंडोरी नवनियुक्त कार्यकारिणीत निवड करण्यात आलेल्या केंद्रातील सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात प्रामुख्याने अध्यक्ष रामदास कराटे ,पद्माकर झिरवाळ उपाध्यक्ष, पोपट राऊत व विनायक दळवी- तालुका सल्लागार ,संदिप चौधरी व गोरक्षनाथ राऊत सहसचिव, मनोहर कोतवाल सचिव, दिलीप सुर्यवंशी पदवीधर प्रतिनिधी ,यादव खांडवी तालुका संघटक, कैलास जोपळे केंद्र प्रतिनिधी,दिपक चौधरी – DCPS प्रतिनिधि, गीता गावित महिला प्रतिनिधि, यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व संघटनेच्या पुढिल वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी ललित गायकवाड अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, किशोर बागूल शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष, काशिनाथ खांडवी शा.व्य. समिती सदस्य,कपिल गायकवाड व अन्य ग्रामस्थ, पिंपळपाडा शिक्षकवृंद पोपट आहिरे मुख्याध्यापक, लक्ष्मण गायकवाड पदवीधर शिक्षक, योगिता गायकवाड, अशोक कोठावदे , विलास धुळेकर,आशा वळवी,यांनी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करून सर्वांचा उचित सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here