Home महाराष्ट्र तीस हजाराची लाच घेताना ग्रामसेवक पकडला; एसीबीची आष्टीत कारवाई

तीस हजाराची लाच घेताना ग्रामसेवक पकडला; एसीबीची आष्टीत कारवाई

233

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

आष्टी(दि.7जानेवारी):-तालुक्यातील गहूखेल/वेलतुरी येथील ग्रामसेवक यांना 30 हजाराची लाच घेताना एसीबीने आज पडकले. त्यांच्यावर लाच प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीच्या वतिने करण्यात आली. ग्रामसेवक सय्यद शकील सय्यद (वय 46 रा.धामनगाव ता. आष्टी) यांनी वेलतुरी ग्राम पंचायत कार्यालयाच्या इमारतीचे दुरुस्तीचे केलेल्या कामाचे नेट पेमेंट चेक देण्यासाठी तक्रारदारांकडून 30 हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराची पैसे द्यायची इच्छा नसल्यामुळे त्यांनी बीड येथील एसीबी कार्यालयाकडे तक्रार केली होती.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर येथील एसीबीने सापळा रचून सय्यद शकील सय्यद यांना 30 हजाराच्या लाच प्रकरणी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक भारत राऊत, सुरेश सांगळे, हनुमान गोरे, श्रीराम गिराम, गणेश म्हेत्रे यांनी केली.

Previous articleमुंबई महापालिकेला जमले नाही; ते बीड पालिकेने करुन दाखविले; चित्रा वाघांकडून सेनेच्या जयदत्त क्षीरसागरांचे कौतुक
Next articleपं. स. चिमूर येथे विपणन व मार्केटिंग विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here