Home महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चूक करणाऱ्या पंजाब सरकारचा डॉ.अजय दादा धोंडे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चूक करणाऱ्या पंजाब सरकारचा डॉ.अजय दादा धोंडे यांनी केला निषेध

369

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.7जानेवारी):-पंतप्रधान नरेंद्र मोदी दि.०५ जानेवारी रोजी पंजाबमध्ये प्रचार करत असताना प्रवासादरम्यान पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था भेदण्याचा प्रयत्न यावेळी झाला,ज्यामुळे नरेंद्र मोदी फिरोझपूरमधल्या प्रचारसभेसाठी जाऊ शकलेबनाहीत.हुसेनीवालामध्ये राष्ट्रीय शहीद स्मारकापासून साधारण ३० किलोमीटर दूर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गाड्यांचा ताफा पोहोचला तेंव्हा काही निदर्शकांनी रस्ता अडवून धरला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उड्डाणपुलावर १५ ते २० मिनीटं अडकून पडले.पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत पंजाब सरकारकडून झालेली ही मोठी चूक होती.

संविधानिकदृष्ट्या देशाच्या सर्वोच्च पदावरील पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक होणं हा अक्षम्य अपराध आहे.जी चूक पंजाब सरकार तसचं पंजाब पोलीस प्रशासन यांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याने भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हासरचिटणीस डॉ.अजय दादा धोंडे यांनी पंजाब सरकारला जबाबदार धरत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पंजाब सरकार व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा तीव्र निषेध व्यक्त करत तहसीलदार विनोद गुंडमवार यांना निवेदन दिले.

यावेळी भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस डॉ.अजय दादा धोंडे यांच्यासह भाजपा अनु.जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अँड.वाल्मिक निकाळजे,बीड जिल्हा सचिव शंकर देशमुख,आर.पी.आय.तालुकाध्यक्ष अशोक साळवे,शिवसंग्राम आष्टी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी,पं.स.सदस्य प्रा.दादासाहेब झांजे,माजी सभापती बापूराव गर्जे,एन.टी.गर्जे,शहराध्यक्ष बाबुराव कदम,जाकीर कुरेशी,माजी सरपंच आण्णासाहेब लांबडे,सचिन घुले,बाबासाहेब ससाणे,सदाशिव पाटील दिंडे,बाळासाहेब शेकडे,देविदास काळपुंड,कल्याण राऊत,आदेश निमोणकर,रजनीकांत भोसले,मारुती शेकडे,देवेंद्र गावंडे,विनोद निकाळजे,शंकर धोंडे यांच्यासह आष्टी तालुका भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here