



🔹भीम टायगर सेना जिल्हाप्रमुख किशोरदादा कांबळे यांचा विशेष पुढाकार
✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.7जानेवारी):-६ जानेवारी हा पत्रकार दिन सर्वत्र साजरा होत असतांना पुसद शहरातील भिम टायगर सेना जिल्हाप्रमुख किशोरदादा कांबळे यांनी पुसद शहरातील पत्रकार बांधवांचा भारतीय संविधानाची प्रत देऊन सत्कार सोहळयाचे आयोजन स्थानिक शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व नुकतेच निधन झालेल्या ज्येष्ठ समाजसेविका, सिंधुताई सपकाळ, व पुसद येथील, पत्रकार संजयकुमार हनवते यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी , ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिनकर गुल्हाने सर, प्रमुख अतिथी म्हणून अखिलेश अग्रवाल, वसंतनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रविण नाचणकर साहेब , प्रा. कवी महेश हंबर्डे, भिम टायगर महिला जिल्हाध्यक्षा गीताताई कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.प्रा.कवी महेश हंबर्डे यांनी विशेष असे मार्गदर्शन केले. भिम टायगर सेना, जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ, असलेल्या सर्व पत्रकार बांधवांना भारतीय संविधान लिखित, “संविधानाची प्रत”, लाख मोलाची भेट देवून यथोचित सत्कार करण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे पत्रकार हा लोकशाहीचा चवथा आधारस्तंभ असुन , प्रसार माध्यमाचे व या सृष्टीच्या विकासाकरीता त्यांचे फार मोठे योगदान आहे.जे प्रसारमाध्यमात मांडले जाते त्यावर जनतेचा प्रगाढ विश्वास असल्याने कोणत्याही प्रसारीत गोष्टीला सार्वजनिक प्रमाणबद्धता प्राप्त होते.आचार्य बाळशास्ञी जांभेकरांनी आजच्या दिवशी “दर्पन” या वृत्तपत्रातुन ही सुरुवात करुन दिली आहे.त्याच बरोबर संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, इत्यादी वर्तमानपत्राच्या माध्यमातून व उपेक्षितांच्या प्रश्नांना वाचा फोडून दीनदलित आदिवासी, श्रमिक, वंचितांना न्याय देण्याचे सर्वश्रेष्ठ काम केले, म्हणून सर्वच बहुजन पत्रकार बांधवांनी सुद्धा तोच वारसा पुढे चालवावा असे आवाहनही यावेळी प्रमुख पाहुणे यांनी बोलताना केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. विलास भवरे सर यांनी केले तर, किशोरदादा कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी भिम टायगर सेनेच्या कार्यकर्तासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, समाजबांधव व पत्रकार प्रा.दिनकर गुल्हाने, रवी देशपांडे, ललित सेता, मारोती भस्मे,अखिलेश अग्रवाल,दीपक हरिमकर,संजय रेक्कावार, मनोहर बोंबले, योगेंद्र पाठक, दीपक महाडिक,राजेश ढोले, स्वप्नील माहुरे,संदेश कान्हु,हमीद शेख,शंकर माहुरे, सय्यद फैज्जोदिन,सय्यद मुजोबदिन, अमोल व्हडगीरे, कैलास जगताप, रेश्मा लोखंडे, मनीष दशरथकर,अब्दुल रहमान,अनिल चव्हाण,उमेश जाजु, बाबा खान,दिलीप खैरे, मुबशिर शेख,समीर रब्बानी, बाबाराव उबाळे ,दिनेश खाडेकर,राजू सोनुने,विष्णू धुळे,कैलास श्रावणे,समाधान केवटे, बळवंत मनवर, रवी खरात ,शेख शेब्बिर, ऋषिकेश जोगदंडे,बाळासाहेब ढोले, आदी
पत्रकार बांधव मोठ्या संख्येने होते.


