Home Education अतिदुर्गम भागातील खेळाळूंना क्रीडेच्या माध्यमातून नाव लौकिक करण्याची उत्तम संधी- महेंद्र ब्राम्हणवाडे

अतिदुर्गम भागातील खेळाळूंना क्रीडेच्या माध्यमातून नाव लौकिक करण्याची उत्तम संधी- महेंद्र ब्राम्हणवाडे

343

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.7जानेवारी):-धानोरा तालुक्यातील रांगी येथे नेहरू युवा केंद्र च्या वतीने तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले असून जिल्हा काँगसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. धकाधकीच्या जीवनात मैदानी खेळांची जागा मोबाईल फोन नी घेतलेली असतांना युवकांना एकत्रित करून राष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याकरिता नेहरु युवा केंद्र प्रभावी माध्यम आहे या माध्यमातून फक्त क्रीडाच नाही तर इतरही सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून युवकांना राष्ट्रीय स्तरावर जाण्याची संधी मिळते. त्यामुळे युवकांनी मोठया संख्येने यात जुळावे व आपल्या करिअर चा मार्ग निवडावा असे आवाहन महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी उपस्थित युवकांना केले.

यावेळी अध्यक्ष म्हणून सरपंच फालेश्वरी गेडाम मुख्य अतिथी म्हणून प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नितीन कोडवते, जिल्हा काँग्रेस सचिव सुनील चडगुलवार, अनुसूचित जाती काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ग्रा.स. शशीकांत साबळे, अर्चना मेश्राम, विद्या कपाट, शशीकला मडावी, वछला हलामी सह गावातील अनेक मान्यवर क्रीडाप्रेमी यावेळी उपस्थित होते. या क्रीडा स्पर्धेत कबड्डी, व्हॉली बॉल, रनिंग सरख्या खेळांचा समावेश असून कार्यक्रमाचे आयोजन नेहरू युवा केंद्र च्या धानोरा तालुका समन्वयक प्रतिक्षा सिडाम व संत गोरोबा युवा मंडळ रांगी च्या वतीने करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here