




✒️रोशन मदनकर(उप संपादक)
सिंदेवाही(दि.7जानेवारी):-माळी समाज तथा क्रांतीज्योती युवा फाउंडेशन, मोहबोडी द्वारा आयोजित ३ जानेवारी २०२२ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आले होते. त्यामध्ये सकाळी ७ वाजता ग्राम स्वच्छता अभियान, सकाळी ८ वाजता मुली व महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, त्यानंतर ९ वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची गावातून शोभायात्रा काढून कार्यक्रम स्थळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती चे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मान. सौ. नलिनी ताई चौधरी, सदस्या पंचायत समिती सिंदेवाही आणि मार्गदर्शक म्हणून श्री. नकटूजी सोनुले माजी प्राचार्य, फुले विद्या. सिंदेवाही, प्रा. धनंजय वाढई, माजी प्रा. सर्वोदय क. विद्या. सिंदेवाही, श्री खेमराज डोंगरवार सर ब्रह्मपुरी, आरती खंगार मॅडम मोहबोडी, कु. किनेकार, वनरक्षक मोहबोडी, यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर गुरणुले, गिरमाजी लेनगुरे, गुलाब मेश्राम, किरण मोहूर्ले, देवानंद मोहूर्ले, विठ्ठल आवळे, योगराज आत्राम, बळीराम मोहूर्ले यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमांमध्ये क्रांतीज्योती युवा फाउंडेशन यांच्या तर्फे दरवर्षीप्रमाणे गाव पातळीवर सामाजिक कार्य करणाऱ्या सौ. छायाताई मोहूर्ले, गिरमाजी लेनगुरे, भाऊजी कन्नाके ( मरणोत्तर ) यांना समाज गौरव पुरस्काराने व अंकेश बागळे याला गुणवंत विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले. तर कला क्षेत्रासाठी नागेंद्र मोहूर्ले यांना गौरविण्यात आले.
दुपारी २ वाजता महिला मेळाव्याचे आयोजन व चर्चासत्र आणि त्यासोबत मुला-मुलींच्या व महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता माळी समाज मोहबोडी यांच्या तर्फे गाव सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. आणि सायंकाळी ७ वाजता विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मुला मुलींचे व महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन राजेवार सर, प्रास्ताविक मधुकर गुरणुले, तर आभार खंगार मॅडम यांनी मानले, कार्यक्रमाच्या आयोजन, आणि नियोजनासाठी, माळी समाज, क्रांतीज्योती युवा फाउंडेशन, युवा गणेश मंडळ, जिल्हा परिषद प्राथ. शाळा, महिला मंडळ, आणि सर्व ग्राम वाशियांचे सहकार्य लाभले.




