Home बीड डॉ.जितीन वंजारे यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा ‘आदर्श समाजसेवा पुरस्कार’ प्रदान

डॉ.जितीन वंजारे यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा ‘आदर्श समाजसेवा पुरस्कार’ प्रदान

299

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

बीड(दि.7जानेवारी):– दर्पण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तर्फे दिला जाणारा मनाचा आदर्श समाजसेवा पुरस्कार २०२२सामाजिक कार्यकर्ते मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांना देण्यात आला.हा सन्मान सोहळा स.मा.गर्गे भवन बीड येथे पार पडला या सोहळ्याचे आयोजक महाराष्ट्र पत्रकार संघांचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा वरिष्ठ संपादक सन्माननीय वैभव स्वामी हे होते तर प्रमुख उपस्थितीत माजी आमदार मा.उषाताई दराडे ,पत्रकार संघांचे महाराष्ट्र अध्यक्ष मा.वसंत मुंढे ,संपादक मा.संतोष माणूरकर , संपादक वैभव स्वामी मनीषाताई तोकले ,डॉक्टर गणेश ढवळे ,मगदूम भाई यासह सत्कारमुर्ती जेष्ठ संपादक मा. गुलाब भावसार आणी जेष्ठ पेपर विक्रेते मा.प्रतापराव सासवडे यासह अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दर्पण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्याच्या सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळीना,पत्रकार मंडळी ,वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक कार्य करणाऱ्या डॉक्टर नर्स आरोग्य कर्मचारी ,एकल महिलां संघटन व महिला सशक्तीकरन करणाऱ्या महिलांना ,इतर क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते या सर्वाना गौरवन्यात आले त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आले.यावेळी खालापूरीचे भूमिपुत्र मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांच्या वैद्यकीय ,सामाजिक आणी राजकीय क्षेत्रातील योगदान पाहुण त्यांना २०२२ चा “आदर्श समाजसेवक पुरस्कार” मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला यावेळी त्यांना सन्मानचिन्ह ,मानपत्र देऊन गौरवन्यात आले.हा पुरस्कार त्यांनी आई संजीवनी वंजारे ,पत्नी स्नेहाराजे वंजारे व मुलगा राजरत्न वंजारे यांच्या उपस्थितीत स्वीकारला .

एका खेडेगावांत राहून कोरोना महामारित डॉक्टर जितीन वंजारे यांनी त्यांच्या संजीवनी सेवाभावी संस्था संचलित संजीवनी हॉस्पिटल आणी ट्रस्ट तर्फे रुग्णांना मोफत सेवा दिली ,कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांना धीर देऊन त्यांची सुष्ऋता केली ,जण जागृती करून स्वच्छता ,सुरक्षित अंतर ,सामाजिक जबाबदारी ,औषधी ,कर्तव्य आणी जबाबदाऱ्या याबाबत गावोगावी प्रचार केला.तसेच गोर गरीब गरजूना अन्नधान्य किराणा आणी आवश्यक वस्तूचे दान केले .रुग्णांना बेड मिळवन्यास प्रयत्न देखील केले या संपूर्ण कार्याची दखल घेऊन आयोजक जेष्ठ संपादक व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष सन्माननीय वैभव स्वामी यांनी सामाजिक कार्यकर्ते मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांना या वर्षीचा आदर्श समाजसेवा पुरस्कार प्रदान केला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध बासरी वादक सन्माननीय अमर डागा यांच्या सुमधुर बासरी वादनाने झाली.तसेच मान्यवर वैभव स्वामी ,डॉक्टर गणेश ढवळे ,मनीषाताई तोकले, मगदूम भाई ,संतोष माणूरकर,गुलाब भावसार ,प्रताप सासवडे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्रराज्य पत्रकार संघाचे राज्यअध्यक्ष वसंत मुंडे आणी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माजी आमदार उषाताई दराडे यांची भाषण झाली.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणी आभार प्रदर्शन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी सरांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here