




✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.6जानेवारी):-ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव पाहता आरोग्य प्रशासनाने प्रत्येक तालुक्याला सतर्कतेचा इशारा दिला. बाहेर फिरताना मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली असून मास्क न वापरणार्यांविरोधात केज तहसील प्रशासनाने दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. आज सकाळी अनेकांना दंड आकारण्यात आला.राज्यात ओमिक्रॉनचे अनेक रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे.
बाहेर फिरताना खरेदी-विक्री करताना मास्क वापरावे, असे सक्तीचे करण्यात आलेले आहे मात्र अनेक जण मास्क वापरत नाहीत. मास्क न वापरणार्यांविरोधात तहसील प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली. आज सकाळी अकरा वाजल्यापासून नायब तहसीलदार आशा वाघ, तलाठी केदार, पोलीस अधिकारी दादासाहेब सिद्धे, पो.कॉ. गवळी, गित्ते, न.प. अधिक्षक अय्युब पठाण, असद खतिब यांनी रस्त्यावर उतरून विना मास्कवाल्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली होती.




