



✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०
येवला(दि.6जानेवारी):- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका येवला यांच्या वतीने आज दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी माता सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली वाचनालयाच्या वतीने पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेची संकल्पना व प्रास्ताविक राजरत्न वाहुळ यांनी केले.परिषदेचे अध्यक्षस्थानी प्राजक्ता जाधव होत्या.शुभांगी मढवई यांनी प्रतिमेचे पूजन केले. परिषदेला विकास शिंगाडे, जीवन दौंडे, उमेश शिंगाडे, अक्षय गरुड, सुमित गरुड आदी उपस्थित होते. स्त्रियांच्या जीवनातील समस्या व उपाययोजना,आत्ताच केंद्र सरकारने घेतलेला निर्णय मुलीचे लग्नाचे वय या बद्दल चर्चा झाली.
स्रियांच्या समस्या जाणून समाज्याची मानसिकता बदलण्याची,जुन्या रूढी व परंपरा सोडण्याची गरज,मुलींना शिक्षण देऊन सक्षम बनवावे नंतरच त्यांच्या लग्नाचा विचार करा असे मत मांडण्यात आले. स्त्रियांवर फक्त पुरुषच अन्याय करतो असे नसून स्त्री ही जबाबदार असते असा मत यावेळी मांडण्यात आले.
स्त्रीभ्रूणहत्या, शिक्षण, सामाजिक दृष्टिकोन, भारतीय समाजजीवनात स्त्रियांचे स्थान अशा विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली आज स्वातंत्र्य ह्या शब्दाचा अर्थ स्त्रियांनी खरोखर योग्य घेतला का, त्यांना तो कळाला का तर यावर चर्चा होऊन अंतिमतः असा निष्कर्ष निघाला की स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ खरोखरच स्त्रियांनी योग्य घेतला नाही. त्याचा खरा अर्थ म्हणजे ज्ञानार्जन, वैचारिक भूमिका, राजकीय व सामाजिक समावेशन असा होतो तो आजच्या स्त्रीने घ्यावा असे सर्वानुमते परिषदेत सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले.परिषदेच्या यशस्वीतेसाठी संस्थापक शरद शेजवळ, अध्यक्ष प्रकाश खळे,सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यु शिरसाठ,बी.डी.खैरनार यांचे मार्गदर्शन लाभले.राजरत्न वाहुल व्यवस्थापक,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका येवला


