Home खेलकुद  डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयांमध्ये विद्यापीठ स्तरीय हँडबॉल स्पर्धा संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयांमध्ये विद्यापीठ स्तरीय हँडबॉल स्पर्धा संपन्न

137

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.6जानेवारी):-स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली- आंतर महाविद्यालयीन हँडबॉल स्पर्धा दि.3 जाने. ते 5 जाने. 2022 या कालावधीमध्ये घेण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. एम.सी शर्मा, गुरुनानक कॉलेज बल्लारपूर यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ. सुभाष शेकोकर, डॉ. कुलजित गिल, ने. हि.महाविद्यालय, ब्रम्हपुरी, डॉ. नागलवाडे, सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही प्रामुख्याने उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन प्रा.तुफान अवताडे यांनी तर आभार प्रा. एस. ओ. बुरखंडे यांनी मानले.

या तीन दिवसीय स्पर्धेमध्ये गोंडवाना विद्यापीठातील अनेक महाविद्यालयांनी सहभाग घेतला. त्यामध्ये पुरुष गटामध्ये : प्रथम क्रमांक, आनंद निकेतन कॉलेज ,वरोरा तर द्वितीय क्रमांक राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय ,विसापूर यांनी आणि तृतीय क्रमांक एन .एच. कॉलेज, ब्रह्मपुरी यांनी पटकाविला. महिला गटामध्ये प्रथम क्रमांक एन .एच.कॉलेज ब्रह्मपुरी तर द्वितीय क्रमांक महात्मा गांधी कॉलेज, आरमोरी, आणि तृतीय क्रमांक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, ब्रह्मपुरी यांनी प्राप्त केला.

दिनांक 4 जाने. 2022 ला बक्षीस वितरण समारंभ संस्थेच्या सदस्या प्रा. डॉ स्निग्धा कांबळे मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाला. विजेत्या संघांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी मंचावर प्रा. शालिनी जयस्वाल, राष्ट्रिय शारीरिक शिक्षण महाविद्यालय, विसापूर, डॉ. एम. सी.शर्मा, डॉ.डी.वि.ठाकरे सर, महात्मा गांधी कॉलेज, आरमोरी उपस्थित होते .या समारोपीय कार्यक्रमाचे संचालन प्रा. एन.पी. गेडाम तर आभार डॉ. ओ.पी.अनेजा यांनी मानले.सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here