



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.6जानेवारी):-भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याने त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, असं साकडं मुंडे समर्थकांनी घातले आहे.वांजरा फाटा ते भगवान भक्ती गडावर पायी दिंडी काढत भगवान भक्ती गडावर दुग्धाभिषेक घालण्यात आलाय.
मागील महिनाभरात पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमास हजेरी लावली होती.आणि त्यानंतर मुंबईत पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे.या संकटातून ताई लवकर बऱ्या व्हा, असं साकडं मुंडे समर्थकांनी घातले आहे.





