Home महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा

बहुजन पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा

68

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.6जानेवारी):-स्थानिक बसस्थानक येथील रेक्कवार बुक स्टॉल येथे आज पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली व सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. बहुजन पत्रकार संघाचे, पदसिद्ध सभासद जे आपल्यातून निघून गेले संजय हनवते पत्रकार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली,या सभेचे प्रास्ताविक बाबूलाल राठोड यांनी पत्रकार दिन अनुषंगाने प्रस्ताविक पर मार्गदर्शन केले.

त्यानंतर बहुजन पत्रकार संघाचे सचिव, राजेश ढोले यांनी पत्रकार दिना निमित्त आपले, मनोगत व्यक्त करून सर्वांनी एकजुटीने, पत्रकाराने बांधवांनी समाजाला न्याय द्यावा अशी आशा व्यक्त केली दर्पणकार, बाळशास्त्री जांभेकर, यांनी केलेली पत्रकारिता व भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी, मूकनायक बहिष्कृत भारत व जनता च्या माध्यमातून मोठ्या समाजाला न्याय देऊन दलित वंचित श्रमिकांना पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय दिला तोच वारसा आपण पुढे चालवावा असे मनोगत व्यक्त करून सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे आभार अध्यक्षांच्या परवानगीने पत्रकार धुळे यांनी आभार व्यक्त केले.

अशा पद्धतीने आजचा बहुजन पत्रकार संघटनेचा पत्रकार दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून, म्हणून संजय रेक्कावर, बळवंत मनवर, मनोहर बोंबले,राजेश ढोले, मनीष दशरथ कर दिनेश खांडेकर कैलास श्रावने, प्रकाश खिल्लारे बाबूलाल राठोड प्रकाश खंडागळे ,विजय निखाते इत्यादी सहित,प्रमुख पाहुणे म्हणून,शंकर माहुरे, प्रशांत देशमुख, माणुसकीची भिंत गजानन जाधव इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here