



🔸घुग्घुस भाजपाची निवेदनातून मागणी
✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.6जानेवारी):- येथील पत्रकार मनोज कनकम हे त्याच्या चंद्रपूर पोस्ट न्यूज पोर्टल व दैनिक सकाळ वर्तमान पत्राच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षा बद्दल व नेत्यांबद्दल चुकीच्या बातम्या छापून पक्षाची व नेत्यांची प्रतिमा मलीन करीत असल्यामुळे घुग्घुस भाजपातर्फे पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांना निवेदन देऊन कडक कारवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.ज्या घटनांशी भाजपा नेत्यांचा संबंध नसतो अश्या घटनांमध्ये हेतूपुरस्पर चुकीच्या बातम्या छापून त्या बातम्या प्रसार माध्यमातून प्रकाशित करत आहे.3 जानेवारी रोजी चंद्रपूर पोस्ट न्यूज पोर्टलवर भाजपा व नेत्यांबद्दल चुकीची माहिती छापली. लॉयड्स मेटल कंपनी विरोधात काँग्रेसचे आंदोलन होते. हे आंदोलन काँग्रेसच्या अंतर्गत दुफळीतून झाले. यात भाजपाचा काही संबंध नसतांना त्या ठिकाणी भाजपाच्या नेत्यांचा नामोल्लेख केला.
त्यामुळे भाजपा नेत्यांनी घुग्घुस येथील चंद्रपूर पोस्ट न्यूज पोर्टल व दैनिक सकाळ चे पत्रकार मनोज कनकम यांच्यावर कडक कारवाही करण्याची मागणी केली आहे.निवेदन देतांना भाजपाचे जेष्ठ नेते संजय तिवारी, माजी जिप सभापती नितुताई चौधरी, माजी सरपंच संतोष नुने भाजपाचे विनोद चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, साजन गोहने, भाजपाचे मल्लेश बल्ला, बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, तुलसीदास ढवस, सुरेंद्र जोगी, आनंद आसमपेल्ली उपस्थित होते.


