




✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)
पुणे(दि.5जानेवारी):-यशस्वी महिला सामाजिक संस्थेच्या संस्थापिका सारिका अतुल मोरे यांच्यातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 192व्या जयंतीनिमित्त पुण्यातील गंज पेठ येथील महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी यशस्वी महिला सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अतुल मोरे ,यशस्वी महिला सामाजिक संस्थेचे उपाध्यक्षाज्योती गालफाडे, राणी बनसोडे,,पुनम प्रधान,मनिषा प्रधान, प्रियांका तापसे,उषा ससाणे, अश्विनी गवळी, स्वीटी शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या मनोगतात बोलतांना सारिका मोरे म्हणाल्या की ,”आज महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याची गरज असून सक्षम होण्याची गरज आहे.महिलांनी सुशिक्षित होवून उद्योजक होणे गरजेचे आहे.त्यामुळे देशाच्या विकासात भर पडेल.”




