Home महाराष्ट्र सावित्रीमाईंच्या जयंतीदिनी लहान माळीवाडा येथे वैचारिक प्रबोधन संपन्न…

सावित्रीमाईंच्या जयंतीदिनी लहान माळीवाडा येथे वैचारिक प्रबोधन संपन्न…

51

🔹शिक्षण क्रांतीच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले – प्रा.भरत शिरसाठ सर

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगांव(दि.4जानेवारी):-३ जानेवारी , २०२२ सोमवार रोजी धरणगाव येथील लहान माळीवाडा परिसरातील गबानंदा चौक येथे ३ जानेवारी ते १२ जानेवारी महामातांच्या जन्मोत्सवानिमित्त महिला शिक्षण दिन, बालिका दिन याचे औचित्य साधून महामातांचा जागर करण्यात आला.या वैचारिक प्रबोधन व्याख्यानाचे प्रास्ताविकाची सुरूवात सावित्रीमाईंचे सुंदर गीत गाऊन विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी केली. प्रास्ताविकात माँसाहेब जिजाऊ ते ज्ञानज्योती सावित्रीमाई या मातांचा जन्मोत्सवानिमित्त नऊ दिवसाचा प्रबोधनाचा जागर धरणगाव तालुक्यातील ग्रामीण भागात करण्यात येणार आहे. यामध्ये विवरे, भवरखेडे, पष्टाने, सोनवद, बांभोरी, गंगापुरी, धानोरे, गारखेडे या गावांचा समावेश आहे.

या वैचारिक प्रबोधनाच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन होते. प्रमुख वक्ते समता शिक्षक परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष प्रा.भरत शिरसाठ सर होते. प्रमुख अतिथी म्हणून लहान माळीवाडा माळी समाज अध्यक्ष रामकृष्ण महाजन, पाटील समाज सचिव गणेश पाटील, तिळवण तेली समाज अध्यक्ष सुनील भाऊ चौधरी, बौद्ध समाजाचे अध्यक्ष दीपक भाऊ वाघमारे, चर्मकार समाजाचे अध्यक्ष भानुदास विसावे, मुस्लिम समाज अध्यक्ष नगर मोमीन, मराठे समाज अध्यक्ष पांडुरंग मराठे, राजपूत समाजाचे गणेश सूर्यवंशी, न.पा.च्या उपनगराध्यक्ष कल्पनाताई महाजन, सामाजिक कार्यकर्त्या दगुबाई महाजन, रुक्माबाई महाजन उपस्थित होते.

सर्व सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले, त्यागमूर्ती रमाई या महामातांचे प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख वक्ते व सर्व विचार मंचावरील उपस्थित प्रमुख अतिथींचे महापुरुषांचे व महामातांचे ग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले.पी.डी.पाटील यांनी प्रमुख वक्ते प्रा. भरत शिरसाठ सर यांचा परिचय करून दिला. आज दुग्धशर्करा योग असून ३ जानेवारी सावित्रीमाईंच्या जन्मदिनी प्रा.शिरसाठ सरांचा देखील जन्मदिवस होता व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांचा ग्रंथ देऊन शिरसाठ यांना जन्मदिनाच्या क्रांतिकारी शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रा.भरत शिरसाठ यांनी शिक्षण क्रांतीच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले यांच्या जीवन संघर्षावर प्रकाश टाकला या सोबतच राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, अहिल्याराणी होळकर, फातिमाबी शेख, त्यागमूर्ती रमाई, विरागंणा झलकारी देवी या सर्व महामातांचे चरित्र उलगडले. या महामातांच्या कार्यकर्तृत्वामुळेच आजची महिला सक्षम झालेली आहे. या सर्व महामातांचे कार्य अतिशय प्रेरणादायी आहे. इतिहासातील विविध उदाहरण दाखले देऊन उपस्थितांना महामातांचे कार्य विस्तृतपणे सांगितले. सावित्रीमाईंचे कार्य सांगत असताना राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांची साथ खूप मोलाची होती. तात्यासाहेब जोतीराव फुले हेच खरे मर्यादापुरुषोत्तम होय असे प्रतिपादन शिरसाठ यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन यांच्यावतीने लोकसभेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ यांनी या स्तुत्य कार्यक्रमाची प्रशंसा केली. हा महामातांचा जागर व सर्व उपस्थितांना महापुरुषांचे ग्रंथ भेट देणे हे धरणगाव तालुक्यासाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन केले.या वैचारिक प्रबोधनाचे सूत्रसंचालन महात्मा फुले हायस्कूल चे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांनी तर आभार हेमंत माळी यांनी मानले. या वैचारिक प्रबोधनाच्या यशस्वीतेसाठी माळी समाज पंचमंडळ लहान माळीवाडा, वैचारिक मित्र आबासाहेब राजेंद्र वाघ, हेमंत माळी, लक्ष्मण पाटील, गोरख देशमुख, निलेश पवार, आकाश बिवाल यांनी परिश्रम घेतले.

Previous articleआष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन
Next articleधम्मविचार साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी डॉ. सतीशकुमार पाटील यांची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here