



✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)
आष्टी(दि.4जानेवारी):-तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी प्रकाशित करण्यात येणाऱ्या आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे मंगळवारी बीड येथे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.सामाजिक कार्यात बीड जिल्ह्यात लोकप्रिय असलेल्या आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येते.
यंदाही आष्टी तालुका युवा पत्रकार संघाने प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचे बीड येथील जिल्हा रुग्णालय परिसरात आयोजित कार्यक्रमात मंगळवार दि. ४ जानेवारी रोजी दुपारी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी आ.बाळासाहेब आजबे,आ.संदीप क्षीरसागर,आ.संजय दौंड,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत,आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम,जावेद पठाण,अक्षय विधाते,अण्णासाहेब साबळे,संतोष नागरगोजे,विलास डोळसे,दत्तात्रय नरनाळे,संतोष हांगे,सुरेश पाटोळे आदी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी आष्टी येथील युवा पत्रकार संघाच्या वतीने प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचे विशेष कौतुक केले.





