



✒️अतुल उनवणे(विशेष प्रतिनिधी)
नवी दिल्ली(दि.4जानेवारी):-राष्ट्रवादीचे (ncp) अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे (ncp mp supriya sule) यांनी पुन्हा एकदा नंबर वनचा किताब पटकावला आहे.हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांची नावे जाहीर झाली असून सुप्रिया सुळे या अव्वल ठरल्या आहेत. (Supriya Sule becomes number one MP in Lok Sabha)
नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विद्यमान 17 व्या लोकसभेतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या अव्वल ठरल्या आहेत. संसदेतील खासदारांच्या कामगिरीच्या आधारावर ‘पीआरएस’ या संस्थेने खासदारांच्या कामगिरीची यादी जाहीर केली आहे.


