Home महाराष्ट्र पँथर केदार यांचा राजकीय बळी जातोय काय? पँथर डॉ. राजन माकणीकर

पँथर केदार यांचा राजकीय बळी जातोय काय? पँथर डॉ. राजन माकणीकर

262

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.4जानेवारी):-ऑल इंडिया पँथर सेनेचे प्रमुख दीपक केदार यांना अटक झाली असून अद्यापही त्यांची सुटका झाली नाही. सदरचा प्रकार हा संशयास्पद वाटत असून केदार यांचा राजकीय बळी जातोय की काय. असा प्रश्न आंबेडकरी व आरटीआय ऍक्टिव्हिस्ट पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केला आहे.

दीपक केदार हे युवा लढवय्ये प्रभावी आणि उमलते नेतृत्व असून 6 डिसेंम्बर रोजी त्यांना अटक झाली आहे, त्यांच्या समवेतच्या 6 कार्यकर्त्यांना मा. न्यायालयाने जामीन दिला देऊन त्यांची सुटका करण्यात आली आहे. मात्र दिपक केदार यांना अजून ही जामीन देण्यात आला नाही.

ज्या समाजाच्या बापाने कायदा लिहिला त्या समाजात आपल्याच धम्मबंधूंना सोडविण्याची कुवत असलेली वकील मंडळी नाहीत काय? ही बाब फार शरमेची आहे. मोठमोठ्या गुन्ह्यातील आरोपिंना कायद्याच्या कचाट्यातून त्यांची वकील मंडळी सोडवते, मग दीपक केदार यांचा गुन्हा फार मोठा आहे का? आज महिना होत आला तरीही त्यांची सुटका नाही.

कळत नकळत दीपक केदार यांचेकडून चूक झाली आहे, सरकारच्या उदासीनतेमुळे ते आक्रमक झाले आणि स्थळ वेळेचे भान हरवून बसले आणि तो प्रकार घडला, हे सत्य असले तरी समाजाने त्यांना माफ करावे व त्यांच्या बिकट काळात त्यांच्या पाठीशी उभारावे असेही आवाहन पँथर ऑफ सम्यक योद्धा चे संस्थापक महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केले.

पँथर ऑफ सम्यक योद्धा संस्थापक अध्यक्ष पूज्य भदंत शिलबोधी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क कांबळे यांचा दीपक केदार यांना पूर्णपणे पाठिंबा असून, दीपक केदार यांच्यावरील सर्व गुन्हे वापस घ्यावेत अश्या आशयाचे निवेदन पत्र मेल मॅसेज समाजाने मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना करावेत व गुन्हे वापस घेण्यास भाग पाडावे अशी प्रतिक्रिया विद्रोही पत्रकार माकणीकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here