Home महाराष्ट्र पंचशील विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

पंचशील विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

143

✒️सिद्धार्थ वाठोरे(हदगाव-नांदेड,प्रतिनिधी)

हदगांव(दि.4जानेवारी):-येथील पंचशील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आदर्श विद्यार्जन मंडळाचे सचिव सुनीलभाऊ सोनुले, शाळेचे मुख्याध्यापक गणेश गोरे,पर्यवेक्षक भारत ताडेवाड व भाऊराव डोरले यांनी तसेच सर्व शिक्षक-शिक्षीकांनी सावित्रीबाईंच्या फोटोला पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शाळेचे शिक्षक राहुल ग्यानोबाराव वाठोरे व त्यांच्या पत्नी कल्पना राहुल वाठोरे यांनी शाळेतील सर्व शिक्षीकांना आरती रेडेकर लिखित साऊ हे पुस्तक भेट दिले राहुल वाठोरे व कल्पना वाठोरे हे दोघे थोर पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमात तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या निरोपसमारंभ कार्यक्रमात थोर व्यक्तींची चरित्रे,
संविधान ग्रंथ व वृक्षांचे रोपटे देऊन सत्कार करतात हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here