Home महाराष्ट्र मांडवा येथील शाळा व्यवस्थापन समिती पुर्नगठित

मांडवा येथील शाळा व्यवस्थापन समिती पुर्नगठित

298

🔹मांडवा येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी विनोद आडे तर उपाध्यक्षपदी स्वाती धम्मदीप ढोले यांची निवड

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

पुसद(दि.4जानेवारी):-तालुक्यातील सावरगाव (बं) केंद्र अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, मांडवा येथील शाळा व्यवस्थापन समिती पुर्नगठित करण्यात आली.यासाठी शिक्षक व पालकवर्ग यांची विशेष पालक सभा घेण्यात आली होती.

नवनिर्वाचित सदस्यामधुन अध्यक्षपदी विनोद आडे तर उपाध्यक्ष पदी स्वाती धम्मदीप ढोले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापिका वृंदा दिगलवार यांनी निवड प्रक्रियेविषय व शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य यावर मार्गदर्शन केले .

यावेळी पोलीस पाटील दत्तराव पुलाते, सोसायटी अध्यक्ष वसंता आडे, राघोजी ढोले,सुधाकर आडे, मनोहर चव्हाण, सुदाम ढोले, रमेश ढोले, जयाजी आबाळे, दिपक ढोले, गणेश ढोले, किरण ढोले, ईत्यादी ग्रामस्थ व समस्त शिक्षकवृंद उपस्थित होते.उपस्थितांनी नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here