



🔸संघर्ष सुरूच ठेवण्याचा संकल्प
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.4जानेवारी);-राज्य मागासवर्ग आयोगाला सर्व शक्ती प्रदान करून ईंपॅरीकल डाटा तात्काळ सादर करण्याच्या मागणीसाठी गंगाखेड येथे मागील २३ दिवसांपासून अखंड एल्गार आंदोलन सुरू होते. हे आंदोलन आज मागे घेण्यात आले. मागासवर्ग आयोगास आजच आवश्यक तो निधी ऊपलब्ध करून देण्यात आल्याने हे आंदोलन स्थगीत करण्यात येत असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
एल्गार परिषदेच्या मंचावर आज क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. याच वेळी राज्य मागासवर्ग आयोगास आवश्यक तो निधी वर्ग करण्यात आल्याची घोषणा ऊपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी केली. तसेच तालुका तहसील प्रशासनानेही या निधीची तरतूद करण्यात आल्याचे लेखी देत ओमायक्रॉन साथीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर हे आंदोलन स्थगीत करण्यात येत असल्याची घोषणा संयोजन समितीच्या वतीने करण्यात आली. तसेच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेवू नयेत यासाठी विविध मार्गांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी दुरध्वनीवरून आंदोलक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आयोगाचे काम गतीत सुरू झाले असून येत्या तीन महिण्यांत ईंपॅरीकल डाटा सादर केला जाणार असल्याचा विश्वास यावेळी बोलताना हाके यांनी दिला. संयोजक गोविंद लटपटे, गोविंद यादव, बालाजी मुंडे, रामप्रभू मुंडे, साधना राठोड, राजेश फड, सुरेश बंडगर, तुकाराम तांदळे, शिवराज पैठणे, रामेश्वर भोळे आदिंनी मनोगते व्यक्त केली.
समता परिषदेचे तालुकाध्यक्ष बालासाहेब यादव, शेख युनूस, दिपक मुरकुटे, निवृत्ती बोमशेटे, अहमद खान गुत्तेदार, मनोहर महाराज केंद्रे, सुनिल कोनार्डे, आदिनाथ मुंडे, माणिक भोकरे, मनोज मुरकुटे, दीपक फड, रमेश कातकडे, प्रमोद साळवे आदिंसह बहुसंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी ऊपस्थित होते.


