




✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.4जानेवारी):-राज्यातला वाढता कोरोना आणि ओमिक्रॉनचा वाढता प्रभाव पाहता बीड जिल्हा प्रशासन अधिक सतर्क होत आज 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या उपस्थितीत जिल्हा रुग्णालयात करण्यात आला.
या वेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी रुग्णालयाची पाहणी केली. जिल्ह्यात 50 केंद्रांवर 15 ते 18 वयोगटातील मुलांना लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात दुपारपर्यंत 140 मुलांनी नाव नोंदणी केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून वयाने 18 पेक्षा कमी असलेल्या मुलांना लसीकरण करण्याबाबत केंद्र आणि राज्य प्रयत्नशील होते, मुलांना लसीकरण द्यायचे की नाही
केव्हा द्यायचे, याबाबत डब्ल्यूएचओसह टास्क फोर्ससोबत वेळोवेळी चर्चा करण्यात आल्यानंतर या वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाची घोषणा करण्यात आली. मात्र त्याची प्रत्यक्षात अमलबजावणी होत नव्हती. गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनासह ओमिक्रॉनचे रुग्ण वाढताना दिसून येऊ लागल्यानंतर लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने कात टाकली.
गेल्या तीन दिवसात प्रतिदिन नऊ ते बारा हजार रुग्णांची वाढ होत असताना रुग्णवाढीचा दर 183 टक्क्यांवर जावून पोहचल्यानंतर 15 ते 18 वयोगटातील मुलांना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. बीड जिल्हा प्रशासनाने या निर्णयाची आज तात्काळ अमलबजावणी करण्यास सुरुवात करून जिल्ह्यात तब्बल 50 केंद्र मुलांच्या लसीकरणासाठी उभारले.




