




✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.3जानेवारी):-सध्याचे स्थितीत संपूर्ण जग महामारी च्या विळख्यात सापडले आहे. अश्या विपरीत परिस्थितीत संपूर्ण जगाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सम्यक विचार तारू शकतात असे विचार ह.भ.प.लालाजी शेंडे महाराज यांनी आपल्या कीर्तनात व्यक्त केले.अमरपुरी येथे आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 53 व्या पुन्यतीथी कार्यक्रमात कीर्तनात ते विचार व्यक्त करीत होते.
ह.भ.प.पुंडलिकराव राणे व रमेश दडमल यांचे हस्ते घटस्थापना करून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.त्यामध्ये ग्रामसफाई, सामुदायिक ध्यान,ग्रामगीता अध्ययन वाचन आदींचा समावेश होता.दरम्यान विविध ठिकाणच्या भजन मंडळांनी भजने सादर केली ज्यामध्ये श्री गुरुदेव भजन मंडळ मजरा, अमरपुरी, सरस्वती महिला भजन मंडळ पेठभांसुली, मंजुळा माता महिला भजन मंडळ, दत्त संप्रदाय भजन मंडळ अमरपुरी, शिवापूर(बंदर) येथील वाल्मिकी भजन मंडळ, शारदा महिला भजन मंडळ व श्री गुरुदेव भजन मंडळ नवेगाव(पुनर्वसन) यांनी सहभाग घेतला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेसह मिरवणूक काढून सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता,मास्क,यावर विशेष काळजी घेतली होती.ह.भ.प.पुंडलीकराव राणे महाराज, श्रीकृष्ण ननावरे, मटाले महाराज, रामभाऊ कोडपे,अरविंद राणे,आदींची भाषणे वं मार्गदर्शन ग्रामवासीयांना लाभले. गोपाळकाला व कीर्तन यशस्वी होण्यासाठी मोतीराम कामडी यांनी अथक परिश्रम घेतले आभार रमेश दडमल यांनी मानले.




