Home महाराष्ट्र स्त्री-शिक्षणाच्या अग्रणी, आद्यशिक्षिका व थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंतीदिन गो.सी.गावंडे...

स्त्री-शिक्षणाच्या अग्रणी, आद्यशिक्षिका व थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंतीदिन गो.सी.गावंडे महाविद्यालयात साजरा .

290

✒️अमोल उत्तमराव जोगदंडे(तालुका प्रतिनिधी)मो:-8806583158

गेवराई(दि.3जानेवारी):-आज सोमवार, दि. ३ जानेवारी २०२२ रोजी गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात भारतातील पहिल्या शिक्षिका, समाजसुधारक, कवयित्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती प्रतिमापूजनाने साजरी करण्यात आली. तसेच यानिमित्ताने राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. के. बी. शिरसे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. एस. इंगळे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्य – कर्तृत्वावर प्रकाश टाकला. प्रमुख वक्ते, कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजीच्या प्रा. नलिनी ठाकरे यांनी विविध उदाहरणे देऊन आणि आई सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. के. डी. बोंपिलवार, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एस. पी. निंभोरकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रा. डॉ. के. बी. शिरसे यांनी करून विद्यार्थ्यांनी महामानवांचे चरित्र अभ्यासले पाहिजे, असे आवाहन केले. आभार मराठी विभाग प्रमुख प्रा. अभय जोशी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे अतुल शिंदे, अनिकेत रावते, इमदाद खान या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
अमोल उत्तमराव जोगदंडे/ तालुका प्रतिनिधी/8806583158

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here