



🔹इमारत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची असल्याची माहिती
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रह्मपुरी(दि. 3जानेवारी):-ब्रह्मपुरी नागभिड राष्ट्रीय महामार्गावरील तूमडीमेंढा येथील एका मोठ्या निर्माणाधीन शाळा इमारतीच्या बांधकामावर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अंगावर फरशी पडून झालेल्या अपघातात एका मजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे निळू केवळराम चाहांदे(३८) राहणार खरबी असे मृतक मजुराचे नाव आहे।ब्रह्मपुरी पासून अवघ्या ५ कि मी अंतरावररील तुमडीमेंढा येथे एका मोठ्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे ही इमारत एका शाळेचे असल्याची माहिती आहे या शाळेतील इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाली असून सध्या आतील काम सुरु आहे.
निर्माणधीन शाळेची इमारतराज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे असल्याची माहिती आहे शनिवारी दुपारी पाच वाजताच्या सुमारास शाळा बांधकामावर एका ट्रकमधून मार्बलच्या मोठ्या मोठ्या फरशा उतरवतांना मार्बल ची फरशी अंगावर पडून निळू चाहांदे या मजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलीस विभागाने या घटनेची नोंद घेत घेऊन शनिवारी रात्री १० वाजता ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथेशवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला व रविवारी मृतकावर अंतिम संस्कार करण्यात आले या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र ऊपरे करीत आहेत.


