



✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.3जानेवारी):-आज दिनांक ३/१/२०२२ रोजी क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त काकडदाती येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान,तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती पुसद यांच्या वतीने काकडदाती प्रभागसंघ येथे आझादी का अमृत वर्ष निमित्त अभियानातील महिला करीता विदर्भ कोंकण ग्रामीण बॅंक व HDFC बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने वित्तीय साक्षरता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. तालुका अभियान व्यवस्थापक गौरवकुमार कांबळे यांनी.शाश्वत उपजीविका व व्यवसाय पर मार्गदर्शन केले. विदर्भ कोंकण ग्रामीण बॅंकेच्या मॅनेजर रजकुंठवार मॅडम,HDFC बॅंकेचे मॅनेजर अमित देवके, यांनी वित्तीय साक्षरता विषयी मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमास उपस्थित तालुका अभियान व्यवस्थापक माहिती प्रणाली अर्षद अहेमद, तालुका व्यवस्थापक राहुल देशमुख काकडदाती गावच्या सरपंच शोभाताई शेवाळे , प्रभागसंघाच्या अध्यक्ष गिरगांवकर ताई, काकडदाती ग्रामसंघाच्या अध्यक्ष पुलाते ताई, प्रभागसंघातील पदाधिकारी, स्वयं सहाय्यता समुहाच्या सदस्या,समुह संसाधन व्यक्ति, कृषी सखी ,पशु सखी, बॅंक सखी ,सिटीसी,एफएलसीआर पी, व मिलिंद ससाने प्रभाग समन्वयक यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता पुलाते यांनी केले व आभार प्रदर्शन प्रतिभा पुलाते यांनी केले.


