




✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.3जानेवारी);-स्वयंदिप महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. ब्रह्मपुरी येथील नवीन वास्तू कार्यालयाचा उद्घाटन समारंभ *मंत्री महाराष्ट्र राज्य बहुजन विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा पालकमंत्री चंद्रपूर मा. नाम. श्री विजय भाऊ वडेट्टीवार* यांच्या हस्ते आज सोमवारला दुपारी दोन वाजता संपन्न झाला.
याप्रसंगी उपस्थित विशेष अतिथी *महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेश संघटक (ओबीसी) मा श्री धनराजभाऊ मुंगले* प्रमुख अतिथी तज्ञ संचालक प्रा. डॉ. राजेशभाऊ कांबळे जिल्हा परिषद सदस्य चंद्रपुर, श्री सुधाकरजी पोपटे, पतसंस्थेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे, उपाध्यक्षा सौ पुष्पलता पोपटे, सौ किरण शेंडे, सौ मीनाक्षी गोवर्धन, सौ ज्योती मेश्राम, सौ सुरेखा चहांदे, सौ सारिका गेडाम,सौ ज्योती जंगले, सौ मेघा खोब्रागडे, सौ चंदा रामटेके,सौ शैला राऊत, संस्था कर्मचारी सुरज धोंगडे, उषा कोचे तसेच संस्थेचे ग्राहक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते




