



🔹दापोरी येथे विद्यार्थ्यांचा लसीकरणाला मोठा प्रतिसाद !
✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मोर्शी(दि.3जानेवारी):-शात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता कोविड १९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम अंतर्गत १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे विनामूल्य लसीकरण मोहिमेचा शुभारंभ दापोरी येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला .
मोर्शी तालुक्यात ग्रामीण भागातील मुलांकरिता दापोरी येथील लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यावेळी १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ उप विभागीय अधिकारी नितीन हिंगोली, गट विकास अधिकारी रवींद्र पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, सरपंच संगीता ठाकरे, उपसरपंच प्रभाकर तायवाडे, ग्राम पंचायत सदस्य शालिनी अंधारे, वैद्यकीय अधिकारी डॉ वैभव कोरडे, केंद्रप्रमुख गजानन चौधरी, डॉ अरविंद वानखडे, राजेंद्र चौधरी, आशा सेविका, यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळा येथील कोविड लसीकरण केंद्रावर करण्यात आला.देशभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरियंटमुळे धास्ती निर्माण झाल्यामुळे लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढवून मोठा दिलासा दिला आहे.
लहान मुलांचे लसीकरन सुरु केल्यामुळे 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाल्यामुळे शाळा विद्यालयातील मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणास मोर्शी तालुक्यात दापोरी येथून सुरुवात झाली आहे. मोर्शी तालुक्यातील मुला-मुलींनी लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन स्वत:बरोबरच कुटुंबाचे कोरोनापासून संरक्षणासाठी सज्ज राहणे गरजेचे असल्याचे उप विभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांनी सांगितले.
100 टक्के मुलांच्या लसीकरणावर भर !
दापोरी येथे सुरु करण्यात आलेल्या किशोरवयीनांच्या लसीकरणासाठी तालुक्यामध्ये जनजागृती करून प्रोत्साहन दिले जात आहे. दापोरी परिसरातील 15 ते 18 वयोगटातील हजारो मुलांचे 100 टक्के लसीकरण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी जास्तीत जास्त मुलांनी लस घ्यावी, विविध शाळांनीही यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केले.


