



🔸बर्थडे बॉय- भिकारी, शहरात दणक्यात पोस्टरबाजी
✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.3जानेवारी):-वाढदिवस म्हंटलं की कधी जेसीबीतून फुलांची उधळण तर कधी तलवारीने केक कापण्याचं फॅड सध्या राज्यभरात दिसून येतं. एखाद्या राजकारण्याचा, लोकप्रिय कार्यकर्त्याचा वाढदिवस असला तर पहायलाच नको.पण या सगळ्या वाढदिवसांपुढे हटके ठरावा, असा वाढदिवस बीड शहरात साजरा करण्यात आला. हा वाढदिवस एवढा जंगी आणि एवढा कौतुकास्पद होता की, आयोजकांवर अनेकांकडून स्तुतीसुमनं उधळली जातायत. आणि बर्थ डे बॉय कोण होता, हे पाहून तर अनेकांना या सेलिब्रेशनचा आणखीच अभिमान वाटेल.
बर्थडे बॉय- भिकारी, शहरात दणक्यात पोस्टरबाजी
बीड जिल्ह्यातील माजलगावच्या तरुणांनी चक्क एका भिकाऱ्याचा वाढदिवस मोठ्या डामडौलात साजरा केलाय. भिकाऱ्याच्या वाढदिवसाचे शहरात बॅनर लावत त्यावर भावी नगरसेवक म्हणून शुभेच्छा देखील देण्यात आले आहेत. डोक्यावर फेटा आणि सेल्फी काढत शिवाय बँडबाजा लावून भिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त शहरात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.
वाढदिवसाला मिठाई भरवताना तरुण
भिकाऱ्याचे वाढदिवस करतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून तो चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान वाढदिवसापोटी पैशांची उधळण करणाऱ्या नेत्यांना आळा बसावा म्हणून हा वाढदिवस साजरा करण्यात आल्याचे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाने सांगितलंय..


