Home बीड पत्रकार तुम्ही सुद्धा ??? पत्रकारांमधील मानापमान नाट्य

पत्रकार तुम्ही सुद्धा ??? पत्रकारांमधील मानापमान नाट्य

88

🔹पत्रकार महोदयांना राजकारणी लोकांनी घेतलेले कार्यक्रम चालतात मात्र पत्रकाराच्या कार्यक्रमावर आक्षेप

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.3जानेवारी):-व्यक्तिगत द्वेषात्मक सदसदविवेकबुद्धी हरवत चाललीय का??….आज नेकनुर ता.जि.बीड येथील पत्रकार अशोक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नेकनुर ग्रामिण रूग्णालयात मोफत नेत्रतपासणी, शस्त्रक्रीया शिबिर कार्यक्रमात उपस्थित होतो, कार्यक्रमात नेकनुर रूग्णालयातील वैद्यकीय आधिकारी,राजकीय आणि अध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती,पत्रकार अशोक शिंदे गेली ४-५ वर्षापासून त्यांच्या मित्रांच्या सहकार्याने नेकनुर ग्रामिण रूग्णालयात मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रीया शिबिर घेत असुन सर्वच स्तरावरून त्यांचे कौतुक होत असताना त्यांच्या आभारपर भाषणात एकदोन जळाऊ वृत्तीनी शिबिर घेण्यास आक्षेप घेतल्याचे कळले व विशेष म्हणजे केवळ आक्षेप घेतलाच नाही तर तसे लेखी निवेदन वैद्यकीय अधिक्षक ग्रामिण रूग्णालय यांना देण्यात आल्याचे कळाले, मला वाटलं कोणीतरी अशिक्षित व्यक्ती असेल परंतु नंतर कळालं आक्षेप घेणारे सगृहस्थ पत्रकार आहेत.

पत्रकार महोदयांना राजकारणी लोकांनी घेतलेले कार्यक्रम चालतात मात्र पत्रकाराच्या कार्यक्रमावर आक्षेप
___
पत्रकाराने लेखी निवेदन वैद्यकीय अधिक्षक स्त्री व कुटीर रूग्णालय नेकनुर ता.जि.बीड यांना देताना राष्ट्रीय महापुरुष, मुख्यमंत्री, उपमुख्य मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या वाढदिवसानिमित्त होणा-या कार्यक्रमांना आक्षेप नाही त्यांची बाब वेगळी परंतु पत्रकाराने वाढदिवसानिमित्त असे कार्यक्रम घेणे म्हणजे आरोग्य यंत्रणेचा गैरवापर असून खपवुन घेतले जाणार नाही असाही ईशारा दिला आहे.

पत्रकारांपेक्षा लोकप्रतिनिधी कसे काय चालतात??
___
मध्यंतरी कोरोना लसीकरण करताना सर्वच पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठमोठाले बॅनर लाऊन आपली जाहीरात करवुन घेतली, लस शासनाची आणि जाहीरात लोकप्रतिनिधींची यावर मात्र पत्रकार महोदयांनी भरपुर बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत मात्र पत्रकार यांना मान-सन्मान का नको असाही प्रश्न पडतो एकंदरीतच वैयक्तिक मतभेदातुन असा सामाजिक उपक्रम राबविण्यात येऊ नये असे लेखी निवेदन देणारा पत्रकार माझ्यातरी पाहण्यात पहिलाच… असो…लोक काय म्हणतिल याचा विचार न केलेलाच बरा पुन्हा एकदा अशोकराव वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here