Home महाराष्ट्र उमरखेड येथे अन्याय अत्याचार प्रतिबंध कृती समिती तयार होणार

उमरखेड येथे अन्याय अत्याचार प्रतिबंध कृती समिती तयार होणार

64

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.2जानेवारी):-येथील विश्रामगृहात अन्याय अत्याचाराच्या विरोधात आणि महापुरुषांच्या विचारांना मानणाऱ्या बहुजन समाजातील स्वाभिमानी, लढाऊ युवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

उमरखेड तालुक्यातील सामाजिक राजकीय कार्यकर्ते मिळून तालुक्यात होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात प्रतिबंध कृती समिती तयार करण्यासाठी उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांनी आपापली मते व्यक्त केली आणि “अन्याय अत्याचाराविरुद्ध सर्वांनी एकत्र येण्याची काळाची गरज आहे”..! अशी महत्वपूर्ण प्रतिक्रिया सर्वांनी व्यक्त केली.

यानंतर विविध विषयावर चर्चा करून पुरोगामी विचाराला मानणाऱ्या पक्ष आणि सामाजिक संघटनेच्या युवकांचे बैठक संपन्न झाली.

पुढील बैठक दिनांक 9 जानेवारी 2021 रविवार रोजी दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह येथे ठेवण्यात आली आहे.
तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे. असे आव्हान करण्यात आले आहे.

यावेळी आव्हानकर्ते देवानंद पाईकराव, सिद्धार्थ दिवेकर, प्रफुल दिवेकर, कुमार केंद्रेकर, श्याम धुळे, डि.के.दामोदर, सुधाकर कांबळे, संबोधी गायकवाड, संतोष जोगदंडे, जॉन्टी विनकरे, मार्शल विनोद बरडे, बबलू भालेराव, नितीन आठवले, नागेश पाटील, सचिन वाहूळे, अथर खतीब, गंगाराम दवणे, सुधाकर कदम, विकास ठोके, पांडुरंग डुकरे, गायकवाड , सुनील मुरमुरे, शंकर सुळ, संतोष भवाळ, विश्वनाथ भगत,सै. सारीक इत्यादी अनेक कार्यकर्ते व समाज बांधव बैठकीला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here