



✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)
पुणे(दि.2जानेवारी):- सरहद संस्था,अर्हम फाउंडेशन व स्वानंद र्फे सरहद कारगिल महोत्सवाचे आयोजन 30 डिसेंबर 2021 रोजी पुण्यातील एस एम जोशी सभागृह येथे करण्यात आले होते.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर उपस्थित होते. याप्रसंगी कारगिलमधील लेह ऑटोनॉमस डेव्हलपमेंट कौन्सिल कारगिलचे अध्यक्ष फिरोज अहमद खान, कार्यकारी अध्यक्ष आगा सैय्यद अब्बास रिजवी, ऑल कारगील टूरिस्ट अँड ट्रॅव्हल्स असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद अली, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, अर्हम फाउंडेशन अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया, स्वानंद चे अध्यक्ष संजीव शहा,युवराज शहा आदी मान्यवर उपस्थित होते. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी पुणे कारगिल आर्चरी अकॅडमी चे अध्यक्ष वैभव वाघ यांच्या पुणे कारगिल आर्चरी अकॅडमीचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
सरहद संस्थेतर्फे पुण्यात तीन दिवसीय सरहद कारगिल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सरहद कारगिल महोत्सवात विविध विद्यार्थ्यांनी शिवनाट्य व नृत्य सादर करून बहुसांस्कृतततेचे दर्शन घडविले.. सरहद संस्थेच्यावतीने 1999 सालापासून कारगिल मधील विद्यार्थी व दहशत ग्रस्त नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात याचाच भाग म्हणून प्रतिवर्षी सरहद् कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते त्याला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळतो. यासंदर्भात पुण्यामध्ये विविध संस्थांसोबत सरहदतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. नितीन करमळकर आपल्या भाषणात म्हणाले की , ‘मी स्वतः द्रास कारगिल भागातील दगडांवर पी. एच. डी. चे संशोधन केले आहे.द्रास, कारगिल ,लेह ही हिमालयाच्या कुशीत वसलेली गावे आहेत. या गावांमध्ये जाण्यासाठी पूर्वी पाच दिवस लागत होते. मी पीएचडीचे संशोधन केले असल्यामुळे माझा या गावांशी भावनिक नाते आहे. तेथील लोक शांत स्वभावाचे आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठही आता या भागातील विद्यार्थ्यांना पुण्यातील शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभारअर्हम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.शैलेश पगारिया डॉ.शैलेश पगारिया यांनी मानले.


